विभागातील सतरा जणांची तहसीलदार संवर्गात पदोन्नती

राज्य सरकारने पुणे विभागातील सतरा नायब तहसीलदारांना सेवा ज्येष्ठतेनुसार तहसीलदार संवर्गात पदोन्नती दिली आहे.
Promotion
PromotionSakal

पुणे - राज्य सरकारने (State Government) पुणे विभागातील सतरा नायब तहसीलदारांना (Tehsildar) सेवा ज्येष्ठतेनुसार तहसीलदार संवर्गात पदोन्नती (Promotion) दिली आहे. (Seventeen Persons Division have been Promoted Post of Tehsildar)

तहसीलदार संवर्गात पदोन्नती मिळालेल्यांमध्ये बजरंग चौघुले, सुनील शेळके, उदयसिंह गायकवाड, अंजली कुलकर्णी, रमेश पाटील, रवींद्र रांजणे, धनंजय जाधव, माधवी शिंदे, अनंता गुरव, रोहिणी शंकरदास, धनश्री शंकरदास, एस. आर. मागाडे, एन. एच. वाकसे, डि. के. यादव, पी. के. पवार, आर. एस. जाधव आणि एन. बी. गायकवाड यांचा समावेश आहे.

Promotion
डीएसके प्रकरण : शिरीष कुलकर्णी यांचा जामीनासाठी अर्ज

पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या पुणे विभागातील नायब तहसिलदारांची पदोन्नती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती. ही पदोन्नती मिळण्याचा मागणीसाठी नायब तहसीलदार पल्लवी लिगाडे आणि अन्य नायब तहसीलदारांनी औरंगाबाद येथील महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणात (मॅट) धाव घेतली होती. यानुसार मॅटने ऑगस्ट २०२० मध्ये पदोन्नती करण्याचा आदेश दिला होता. या आदेशानुसार राज्य सरकारने आज ही पदोन्नती दिली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com