सातव्या दिवशीही बॅंकांसमोर रांगा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

पिंपरी - चलन बदली करून देण्याचे व्यवहार अविरतपणे सुरू असतानाही बॅंकांसमोरील रांगा आज सातव्या दिवशीही "जैसे थे' राहिल्या. शहरातील 90 टक्के एटीएम बंदच राहिल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. रोखीच्या दैनंदिन व्यवहारालाही व्यवहारांनाही जवळपास खिळ बसली.
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान

मोदी यांनी मागील मंगळवारी जाहीर केला. त्यानंतर चार हजार रुपयांपर्यंतच्या नोटा बदलून देण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष गुरुवारपासून (ता. 10) सुरू झाली. पुढील दोन ते तीन दिवसांत व्यवहार सुरळीत होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, आज सातव्या दिवशीही परिस्थिती कायम राहिली. सर्व बॅंकांसमोर सकाळी आठपासून रांगा लागल्या होत्या. सायंकाळी बॅंका बंद होईपर्यंत रांगा कायम होत्या. तीन ते चार तास रांगेत थांबल्यानंतर नागरिकांना चलन बदलून मिळत होते. त्यातही अनेक बॅंकांमध्ये शंभर रुपयांची नोट उपलब्ध नसल्याने खातेदारांची दोन हजारांच्या नोटेवर बोळवण करण्यात येत होती. बाजारपेठेत सुटे पैशांची वानवा असल्याने दोन हजार रुपये कसे काय वठवायचे, असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात होता. त्यामुळे बॅंक कर्मचाऱ्यांबरोबरील वादाचे प्रसंगही घडत होते. एटीएम सुरू झाल्यानंतर व्यवहाराला सुरळीत होण्याला वेग येईल, अशी नागरिकांना आशा होती. मात्र, बॅंकांनी त्याबाबतही निराशा केली. त्यामुळे बॅंकांसमोर रांगा लावण्या व्यतिरिक्त नागरिकांसमोर पर्याय नव्हता.