हिंजवडीत सेक्‍स रॅकेटचा पर्दाफाश

Prostitution
Prostitution

हिंजवडी - सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राहकांना बोलावून वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या ‘सेक्‍स रॅकेट’चा सामाजिक सुरक्षा विभाग व हिंजवडी पोलिसांनी पर्दाफाश केला. हिंजवडीतील मुकाईनगर भागात मंगळवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास छापा घालण्यात आला. विशेषतः भरवस्तीत पेइंग गेस्ट (पीजी) म्हणून आयटीयन्स वास्तव्यास असणाऱ्या इमारतीत हा प्रकार उघडकीस आल्याने आयटीयन्समध्ये एकच खळबळ उडाली.

या छाप्यात सापडलेल्या एकूण सात तरुणींची सुटका करण्यात आली, तर रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या दलाल व व्यवस्थापक अशा पाच जणांना अटक करण्यात आली. एक जण फरार आहे. 

बिजू भक्तिप्रसाद शर्मा (वय २२), कुमार बलबहादूर प्रधान (वय ४०), रणजित बलबहादूर प्रधान (वय २५), श्‍यामसुंदर गंगाबहादर नेवार (वय २३), बळिराम फोनी गौड (वय २२, सर्व जण मूळचे आसाम सध्या रा. मुकाईनगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिस निरीक्षक मनीषा झेंडे, योगिता कुदळे यांच्या पथकाने ही कारवाई केली. हिंजवडीतील मुकाईनगर भागातील गणपती मंदिराजवळील लक्ष्मी नरसिंह ही इमारत ‘क्विकर होम’ या एजन्सीला भाडेतत्त्वावर दिली आहे. येथे सेक्‍स रॅकेट सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना सूत्रांकडून मिळाली होती. त्यानुसार त्यांनी हिंजवडी पोलिसांच्या मदतीने सापळा रचून पाच दलालांसह देहविक्री करणाऱ्या सात मुलींना ताब्यात घेतले. मुलींची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना सुधारगृहात पाठविण्यात आले, अशी माहिती हिंजवडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांनी दिली.

सोशल मीडियाचा वापर
छाप्यातून सुटका केलेल्या मुली दिल्ली, पंजाब, बंगाल, मध्य प्रदेश, नेपाळ आणि महाराष्ट्रातील आहेत. हे दलाल सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे फोटो पाठवून ग्राहक बोलावून तरुणींकडून वेश्‍या व्यवसाय करून घेत होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com