हडपसर रेल्वे स्थानकात शेडचे काम सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

केशवनगर - मुंढवा येथील हडपसर रेल्वे स्थानकात प्रवाशांसाठी अद्ययावत शेड उभारण्याचे काम वेगात सुरू आहे. 

नेहमीच प्रवाशांनी गजबजणाऱ्या या स्थानकात आसनव्यवस्था अपुरी पडत होती. ऊन-पावसापासून संरक्षण करणारे शेडही अपुरे पडत होते. त्यामुळे प्रवाशांना भर उन्हात जमिनीवर बसावे लागत होते. या बाबत ‘सकाळ’ने वेळोवेळी बातम्या प्रसिद्ध करुण रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत प्रशासनाने या ठिकाणी अद्ययावत शेड उभारण्याचा निर्णय घेतला. सध्या शेडचे काम वेगात सुरू आहे.

सहा-सात वर्षांपासून या स्थानकात प्रवाशांची गर्दी होत आहे. एकेकाळी बोटावर मोजण्याइतकेच प्रवासी या स्थानकातून प्रवास करत होते; परंतु हडपसर परिसराचा कायापालट झाल्याने मगरपट्टा सिटी, ॲमनोरा पार्क, सीझन मॉल आदी ठिकाणी अनेक तरुण-तरुणींना रोजगाराची संधी मिळाली. 

यामुळे दौंड, यवत, केडगाव, लोणी या ग्रामीण भागातून अनेक तरुण-तरुणी, महिला-पुरुष हडपसर भागात रोजगारासाठी येऊ लागले. येथील अनेक शेतकऱ्यांनी पाटस, दौंड, लोणी या भागात शेती घेतली आहे. त्यामुळे हे शेतकरी या स्थानकावरूनच रेल्वेने आपल्या शेताकडे जातात. परंतु शेडअभावी व बैठक व्यवस्थेअभावी रेल्वे प्रवाशांना भर उन्हातच जमिनीवर बसावे लागत होते. आता मात्र काही दिवसातच शेडचे काम पूर्ण होणार असून, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय टळणार आहे.