फसवणाऱ्यांवर कारवाईची हिंमत का नाही : यादव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 29 नोव्हेंबर 2016

पुणे : "काळ्या पैशाविरोधातील या लढाईला विरोध नाही; परंतु ज्या पाच-दहा लोकांनी बॅंकांना दहा लाख कोटी रुपयांना फसविले आहे, त्यांच्यावर कारवाईची हिंमत सरकार का दाखवत नाही,'' असा सवाल संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष खासदार शरद यादव यांनी केला.

एका कार्यक्रमासाठी यादव पुण्यात आले असताना पत्रकारांनी त्यांची भेट घेतली. त्या वेळी यादव यांनी हा प्रश्‍न उपस्थित केला.

यादव म्हणाले, ""बॅंकांच्या "एनपीए'मध्ये ज्यांचा पैसा दाखविण्यात आला आहे, त्यांच्यावर सरकारने कारवाई केली असती तरी नोटाबंदीचा निर्णय घेण्याची गरज पडली नसती. बॅंकांना त्यांच्यामुळे जो तोटा झाला आहे, तो सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून सरकारने जमा केला आहे.''

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केल्याबद्दल विचारले असता यादव म्हणाले, ""नितीशकुमार आणि माझ्या भूमिकेत कोणताही फरक नाही. नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर सर्वसामान्यांचे जे हाल सुरू आहेत, त्यांची जबाबदारीही सरकारने घ्यायला हवी.''

सरकारच्या या निर्णयाविरोधात पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी का झाला नाहीत, यावर, ""सरकारच्या या निर्णयाबद्दल पक्षाची भूमिका अगदी पहिल्या दिवसापासूनच मांडत आलो आहे. त्यामुळे विरोधकांच्या आंदोलनात सहभागी होण्याची गरज वाटली नाही,'' असे उत्तर यादव यांनी दिले.