शेअर करा वडिलांबद्दलच्या भावना, कविता, सेल्फी..

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जून 2016

इवल्या-इवल्या बोटांना धरून लहानपणी बाबा आपल्याला पुढे चालायला शिकवतात. मग आयुष्यभर आपण पुढे चालत राहावं, वेगाने धावत राहावं यासाठी ते धडपडत राहतात. अगदी अखेरच्या श्‍वासापर्यंत. स्वत:ला विसरून ते आपल्यासाठी, आपल्या आनंदासाठी झटत राहतात. त्यामुळे आईप्रमाणेच बाबांसाठीही आपल्या हृदयात एक वेगळाच आदराचा कप्पा तयार होतो. ज्या हातांमध्ये बोट देऊन आपण चालायला शिकलेलो असतो. तोच हात ज्यावेळी थरथरतो त्यावेळी आपल्या हातात विसावत असतो. तेव्हा कुठे वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतले, याची जाणीव आपल्याला होऊ लागते. तेव्हा जगासाठी आपण मोठ्ठे झालेलो असतो.

इवल्या-इवल्या बोटांना धरून लहानपणी बाबा आपल्याला पुढे चालायला शिकवतात. मग आयुष्यभर आपण पुढे चालत राहावं, वेगाने धावत राहावं यासाठी ते धडपडत राहतात. अगदी अखेरच्या श्‍वासापर्यंत. स्वत:ला विसरून ते आपल्यासाठी, आपल्या आनंदासाठी झटत राहतात. त्यामुळे आईप्रमाणेच बाबांसाठीही आपल्या हृदयात एक वेगळाच आदराचा कप्पा तयार होतो. ज्या हातांमध्ये बोट देऊन आपण चालायला शिकलेलो असतो. तोच हात ज्यावेळी थरथरतो त्यावेळी आपल्या हातात विसावत असतो. तेव्हा कुठे वडिलांनी आपल्यासाठी किती कष्ट घेतले, याची जाणीव आपल्याला होऊ लागते. तेव्हा जगासाठी आपण मोठ्ठे झालेलो असतो. पण त्या थरथरणाऱ्या हातांसाठी, वडिलांसाठी आपण लहानच असतो. 

दादा, आप्पा, तात्या, बाबा, बाप, वडिल, फादर, डॅड किंवा अन्य कोणत्या तरी एका नावाने वडील कायम आपल्या हृदयात असतात. भलेही ते या दिसणाऱ्या जगात असोत अथवा नसोत. ते कायम आपल्या जवळच असतात. वडील म्हटले की बागेत नेणारे, फिरायला नेणारे, गावाला नेणारे, शाळेत नेणारे, काही चुकलं तर मार देणारे, रागावणारे, पॉकेटमनी देणारे अशा हजारो आठवणी समोर दिसू लागतात. याच वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे 19 जून अर्थात "फादर्स डे‘. खरं तर वडिलांबद्दलची कृतज्ञता एका दिवसात व्यक्त करताच येणारी नाही. मात्र, धकाधकीच्या जीवनात किमान एक दिवस तरी वेळ काढून वडिलांशी गप्पा मारण्याचं हे छान निमित्त समजायला हरकत नाही. त्यामुळेच तर वडिलांबद्दलच्या भावना व्यक्त करण्याची संधी आम्ही "फादर्स डे‘च्या निमित्ताने तुम्हाला देत आहोत. तुम्ही वडिलांबद्दलच्या भावना लेखाच्या किंवा कवितेच्या स्वरुपात आमच्याकडे लिहून पाठवू शकता. "फादर्स डे‘च्या निमित्ताने आम्ही हे साहित्य प्रसिद्ध करणार आहोत "सकाळ‘मध्ये. अगदी वडिलांसोबतच्या छानशा सेल्फीलाही प्रसिद्धी दिली जाईल. 

  • तुमचा प्रतिसाद (लेख, कविता, सेल्फी) webeditor@esakal.com या ई-मेलवर पाठवा. 
  • सोबत तुमचा संपर्क क्रमांक, पत्ता अवश्‍य द्या. 
  • सब्जेक्‍ट बॉक्‍समध्ये "माझे वडिल‘ लिहा.
Web Title: share feelings for your father