शिक्रापूर बाह्यमार्गासंबंधी २१ रोजी बैठक

शिक्रापूर (ता. शिरूर) - प्रस्तावित बायपासबाबतच्या स्थानिकांच्या अडचणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सांगताना रामदास भुजबळ.
शिक्रापूर (ता. शिरूर) - प्रस्तावित बायपासबाबतच्या स्थानिकांच्या अडचणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना सांगताना रामदास भुजबळ.

शिक्रापूर - चाकण-शिक्रापूर-न्हावरा राष्ट्रीय महामार्गासाठी प्रस्तावित केलेल्या पाच किलोमीटरच्या नवीन बाह्मामार्गामुळे शेकडो शेतकरी विस्थापित होणार आहेत. यामुळे आमचा विरोध आहे, अशी भूमिका शेतकऱ्यांनी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यापुढे मांडली. यावर या प्रकरणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व पीएमआरडीए अधिकाऱ्यांबरोबर तक्रारदार शेतकऱ्यांची विशेष बैठक २१ जुलै रोजी निश्‍चित केल्याचे आढळराव पाटील यांनी जाहीर केले.

जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे व शिरूर बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांची एक बैठक आढळराव यांच्या उपस्थितीत झाली. 

पुणे-नगर रस्त्याबरोबरच चाकण-शिक्रापूर- न्हावरा राष्ट्रीय महामार्ग मंजूर केला आहे. त्यासाठी चाकण चौकाऐवजी वेगळा स्वतंत्र बायपास प्रस्तावित केलेला आहे. 

जुन्या टोल नाक्‍यापासून पुढे तळेगावपर्यंत गेलेल्या या रस्त्यासाठी नव्याने भूसंपादन करावे लागणार असून, आधीच इतर रस्त्यांसाठी संपादित क्षेत्र बाधित शेतकऱ्यांचेच नव्याने क्षेत्र संपादित होणार असल्याने आमचा विरोध असल्याची भूमिका शिक्रापूर व तळेगाव-ढमढेरे बायपास रस्ताबाधित शेतकरी कृती समितीचे वतीने रामदास भुजबळ व आबाराजे मांढरे, घोडगंगाचे संचालक पोपट भुजबळ, महेश भुजबळ यांनी मांडली. बैठकीला जिल्हा परिषद सदस्य माउली कटके, शिवसेना जिल्हा उपसंपर्कप्रमुख अनिल काशीद, रवींद्र करंजखिले, डॉ. पोकळे, पोपट शेलार, माउली खेडकर, वसंत जकाते, रोहिदास भुजबळ व शेतकरी उपस्थित होते.     

सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या...
कुसुम मांढरे व आबाराजे मांढरे हे राष्ट्रवादीचे. मात्र, नव्या बायपासप्रश्नी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मांढरे यांच्या घरी येणे आणि त्याच वेळी स्थानिक शिवसेनेचे कार्यकर्ते या प्रसंगी अनुपस्थित राहणे यातील राजकारण नक्कीच रंजक आहे. खासदार आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुणाही कार्यकर्त्याकडे जाण्याने काय गहजब होतो हे यापूर्वी पंचायत समिती सदस्या दीपाली शेळके यांनी अनुभवलेले आहे. मात्र, रस्त्याच्या कामाचे कारण काढून झालेले खासदारांचे आगमन हे राजकीय नसल्याचे या वेळी दोन्ही बाजूंकडून सांगण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com