सासवडला शिवजयंतीनिमित्त शिवज्योत व मिरवणुक रंगली

श्रीकृष्ण नेवसे
बुधवार, 18 एप्रिल 2018

सासवड (जि. पुणे) : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने येथे कोडीतनाका चौकातील छत्रपती शिवजयंती मंडळाने विविध कार्यक्रम आयोजित केले होते. यानिमित्ताने किल्ले पुरंदरवरुन काल शिवज्योत आणली.. त्याचे उत्साहात स्वागत झाले. तर सायंकाळनंतर काढलेली नगरप्रदक्षिणेची मिरवणुक लक्षवेधी ठरली. ती रात्री उशिरापर्यंत वाद्यांच्या संगतीत व रोषणाईत.. कार्यकर्त्यांच्या उत्साहात रंगली.

काल सकाळी किल्ले पुरंदर येथून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत सासवडला न्यायालयाजवळ नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष मनोहर जगताप, माजी नगराध्यक्ष आर. एन. जगताप, दिलीपराजे जगताप, भानुकाका जगताप, नगरसेवक संजय ग. जगताप, अजित जगताप, संदिप जगताप, सुहास लांडगे, बंडू हिवरकर, प्रविण भोंडे, दिनेश भिंताडे आदींनी केले.

यानिमित्ताने पालिकेत मार्तंड भोंडे, मोहन चव्हाण, मुख्याधिकारी विनोद जळक आदी उपस्थित होते. संयोजन मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र ना. जगताप, उपाध्यक्ष सौरभ धनंजय जगताप, खजिनदार दिपक जगताप, व्यवस्थापक दत्तानाना जगताप, संजय ग. जगताप, दिलीपराजे जगताप आदींनी केले. तर नगरपालिका चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे पूजन करुन तिथेही ज्योतीचे स्वागत जल्लोशात झाले. तर सायंकाळी उशिरा विविध फुलांनी, विद्युत रोषणाईने सजविलेल्या रथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणुक काढली.

या मिरवणुकीचा शुभारंभ कोडीतनाका चौकातील छत्रपती शिवजयंती मंडळात झाली. तर सासवड शहरात विविध चौक, रस्त्याच्या दुतर्फा विविध मान्यवरांनी मिरवणुकीचे स्वागत केले. काही ठिकाणी मावळतीच्या रंगात व पावसाच्या हलक्या शिडकाव्यातही मिरवणुकीचे स्वागत झाले. त्यातून शिवभक्तांमध्ये चांगलाच उत्साह वाढला. वातावरण शिवमय व भगवे झाले होते.

Web Title: Shiv Jayanti celebration in Saswad