शिवसेना जाणार घराघरांत 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

कोंढवा - सत्ताधाऱ्यांकडे विकासाची दृष्टी नसल्याने कोंढवा-येवलेवाडी परिसराचा विकास खुंटला असून, जनता त्रस्त आहे. यामुळे कोंढवा-येवलेवाडीमध्ये यंदा शिवसेनेचा भगवा झेंडाच फडकेल, असा विश्‍वास व्यक्त करत शिवसेनेच्या चारही उमेदवारांनी प्रचाराचे रणशिंग फुंकले. घराघरात पोचण्याची व्यूहरचना पक्षाने आखली आहे.

कोंढवा-येवलेवाडी प्रभागातील (प्रभाग ४१) शिवसेनेचे उमेदवार गंगाधर बधे, संगीता ठोसर, मनीषा कामठे, रमेश गायकवाड यांनी ग्रामदैवत काळभैरवनाथाचे दर्शन घेतले. माजी आमदार महादेव बाबर यांनी प्रचाराचा श्रीफळ वाढवला. या वेळी शिवसेनेचे प्रमुख कार्यकर्ते अमोल हरपळे, चिंतामणी जगताप, गणेश कामठे, मधुकर मरळ, शिवाजी बधे, हेमंत बधे, शामराव मरळ, चंद्रकांत गायकवाड, दत्ता घोडके, सचिन कामठे, आदित्य हगवणे, सुनील कामठे, दादाश्री कामठे, जयसिंग कामठे, दादा धांडेकर, भगवान शिंदे, गोरख पांगारे, सतीश गायकवाड, महिला व तरुण कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आर. पी. आय. पक्षाचे चिंतामणी जगताप, वीरू सय्यद यांनी शिवसेना पक्षाला पाठिंबा जाहीर केला.

गंगाधर बधे म्हणाले, ‘‘कोंढवा बुद्रूक येथील कात्रज-कोंढवा बाह्यवळण मार्गावर धोकादायक परिस्थितीत अपुऱ्या जागेत असणाऱ्या स्मशानभूमीचा प्रश्न शिवसेना मार्गी लावेल, येथील शेकडो तरुणांना आणि महिलांना स्वयंरोजगार प्रशिक्षण दिले जाईल. स्वच्छ व सुरक्षित कोंढवा बुद्रुक हे शिवसेनेचे स्वप्न आहे. या निवडणुकीत परिवर्तन होणार आहे.’’

घोषणांमुळे परिसर दणाणला
भगवे झेंडे घेऊन ‘जय भवानी, जय शिवाजी’, अशा घोषणा देत तरुणांनी कोंढवा बुद्रुक गावठाण, आंबेडकरनगर, साईनगर, हगवणे वस्ती, लक्ष्मीनगर परिसर दणाणून सोडला. तरुणांच्या प्रतिसादाने आणि धनगर, मुस्लिम बांधव, खाण कामगार, मराठवाडा, खानदेश आदी भागांतील नागरिकांच्या पाठिंब्यामुळे शिवसेनेच्या प्रचारात रंगत आणली. 

Web Title: Shiv Sena will house to house