ऐका हाे ऐका! ८ हजार लोकांसाठी ५ नळ

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

पुणे - शिवाजीनगर येथील न्यायालयात रोज साधारणतः सहा हजार पक्षकार, दीड हजार वकील, न्यायालयीन कर्मचारी, पोलीस व आरोपींची वर्दळ असताना शौचालयांची संख्या आहे केवळ १२६. यातील अनेक शौचालयांची अवस्था दयनीय आहे. न्यायालयाच्या आवारात पिण्याच्या पाण्याचे केवळ नऊ नळ असून, त्यातील चार नळ बंद आहेत. आठ हजार लोकांसाठी केवळ पाच नळ असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे. 

न्यायालयात पक्षकार महिलांसाठी १७ शौचालये असून, त्यातील सात ते आठ शौचालयांची दुरवस्था झाली आहे. सफाईचा अभाव, तुटलेले दरवाजे, वापरलेले सॅनिटरी नॅपकिन्स टाकण्यासाठी डब्याची नसलेली सोय, परिणामी शौचालयात इतस्ततः पडलेले नॅपकिन्स, गळके वॉश बेसिन अशी दैना या शौचालयांत आहे.

दिव्यांग, अंध व्यक्तींसाठी सुलभ प्रकारची शौचालये नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होते. पक्षकारांसाठी नवीन इमारतीत शौचालये आहेत, मात्र सिव्हील इमारत, बरॅक इमारत, पीडब्ल्यूडी इमारत व लघुवाद इमारत अशा चार इमारतीत पक्षकारांसाठी शौचालयच नाही. लघुवाद इमारतीत वकिलांसाठीच्या शौचालयाचाच वापर पक्षकार करतात, अशी माहिती ॲड. हाफीज काझी यांनी दिली.

याबाबत न्यायालयाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता, शौचालयांच्या समस्येबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला अहवाल दिला असून, लवकरच या समस्येवर कार्यवाही होईल, असे सांगण्यात आले. 
दरम्यान, कौटुंबिक न्यायालयात मात्र पुरेशी शौचालये असून, त्यांची नियमित सफाई होत असल्याचे आढळून आले.

न्यायालयाच्या आवारात पिण्याच्या पाण्याचे केवळ नऊ नळ असून, त्यातील चार नळ सध्या बंद आहेत. आठ हजार लोकांसाठी केवळ पाच नळ सुरू असल्याने पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर आहे.

वकिलांसाठी असलेल्या शौचालयांची स्थिती भयंकर आहे. शौचालयांची संख्या कमी आणि अस्वच्छता असल्याने मी बऱ्याचदा जवळपासच्या एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जाते. न्यायालयात दिवसातले सहा-सात तास जातात. अशा वेळी वकील, पक्षकारांसाठी शौचालय, पिण्याचे पाणी या मूलभूत गरजा गुणवत्तापूर्ण देणे आवश्‍यक आहे.  
- ॲड. विजयालक्ष्मी खोपडे

न्यायालयातील शौचालयांची संख्या
महिला पक्षकारांसाठी    १७  
पुरुष पक्षकारांसाठी    १७
महिला आरोपींसाठी    ३
पुरुष आरोपींसाठी    ३
वकिलांसाठी     ७३
इतर कर्मचाऱ्यांसाठी     १३

Web Title: shivajinagar court toilet water connection