टीका सोपी, मदत अवघड - श्रीनिवास पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

पुणे - ‘‘आयुष्यभर कष्ट सोसून स्वतःची ओळख निर्माण करतात. त्या व्यक्तींची ती ओळख कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. एखाद्यावर टीका करणे सोपे असते. मात्र कोणाला तरी मदतीचा हात देणे तितकेच अवघड होय,’’ असे मत सिक्किमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केले. 

कोकणस्थ परिवार व शिवम फाउंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रा. नाना फटाले यांना पाटील यांच्या हस्ते ‘भाई नेवरेकर क्रीडा जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रजनी श्रीनिवास पाटील, उल्हास पवार, ॲड. विजय सावंत, अस्फिया सैय्यद उपस्थित होते. क्रीडा क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल प्रतिभा खोत, मदन पुरंदरे, पराग गानू, डॉ. अमोल सप्तर्षि, दत्ता शिंदे, पृथ्वीराज ओहाळ, भावना नेवरेकर, श्रेया नानकर, अमोल कर्चे आदींचाही पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
पाटील म्हणाले, ‘‘खेळ असो व अन्य क्षेत्र असो. यशस्वी होण्याकरिता कर्तृत्ववान व्यक्तींचा हात हातात घ्यावा. आम्ही तरुण असताना व्यायामाला विशेष महत्त्व होते. आजही आहे मात्र खेळासारख्या क्षेत्राला आता चांगले दिवस आले आहेत. खेळामध्ये विक्रम करणारी माणसे पुण्यात यापूर्वी होती आणि आज देखील आहेत.’’ 

Web Title: shrinivas patil talking