रणगावमधील कुस्तीत माऊली जमदाडेने पटकावली चांदीची गदा

राजकुमार थोरात
मंगळवार, 29 मे 2018

वालचंदनगर (पुणे) : रणगाव (ता.इंदापूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या माऊली जमदाडे ने नंदु आबदार पराभव करुन प्रथम क्रंमाकाची कुस्ती जिंकून दोन लाख रुपयांचे बक्षीस व चांदीची गदा पटकावली.

वालचंदनगर (पुणे) : रणगाव (ता.इंदापूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या माऊली जमदाडे ने नंदु आबदार पराभव करुन प्रथम क्रंमाकाची कुस्ती जिंकून दोन लाख रुपयांचे बक्षीस व चांदीची गदा पटकावली.

येथे संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सोमवारी (ता. 28) भव्य लाल मातीमधील कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रथम क्रंमाकाची कुस्ती माऊली जमदाडे व नंदु आबदार यांच्यामध्ये रंगली दहा मिनीटे चाललेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये जमदाडे यांनी घिस्सा डावावर आबदार याला पराभूत करुन विजय मिळवला.  द्वितीय क्रंमाकाच्या कुस्तीमध्ये योगेश बोंबाळे यांनी संतोष दोरवड यांचा पराभव केला.  प्रविण राजवडे याने सचिन पाटील याला पराभूत केले. तर सागर मारकड याने  निखील कदम याला आस्मान दाखविले.

नागेश गायकवाड याने सिरेश गोफणे  याचा पराभव केला. कुमार रणमोडे व अशोक देवकाते, अमोल कोळेकर व  बाळू सपाटे यांची कुस्त्या बरोबरीमध्ये सोडविण्यात आली.  यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती यशवंत माने, संचालक दत्तात्रेय फडतरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील,जंक्शनचे सरपंच राजकुमार भोसले, अशोक राजीवडे,श्रीमंत रोहितराजे देशमुख पवार, अनिल बागल, अादित्य सातव, अशोक घोलप,अंकुश रणमोडे,भाऊसाहेब रकटे,राजेंद्र महाडीक  उपस्थित होते. कुस्ती स्पर्धेचे आयोजन आखाडा प्रमुख  रणजित पवार यांनी केले.

Web Title: silver bludgeon wins in wrestling by mauli jamdade