पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 मार्च 2017

पुणेः सिंहगड संस्थेच्या वेणूताई चव्हाण अभियांत्रीकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱया आकाश भरत वैष्णव (वय१८) या विद्यार्थ्याने आज (बुधवार) गळफास लावून आत्महत्या केली. या महिन्यात सिंहगड महाविद्लयाच्या तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

सातार येथील असलेला आकाश स्थापत्य शास्त्र पदवीच्या दुसऱया वर्गात शिकत होता. प्रथम वर्षात तो प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. परंतु, दुसऱया वर्षातील पहिल्या सेमीस्टरच्या परिक्षेत तीन विषयात तो नापास झाला होता. तो महाविद्यालयाच्या कावेरी होस्टेल मध्ये मित्र साईराज संजय आनंदकर व भागेश चेतन कडीवाला यांच्या सोबत राहत होता. मंगळवारी (ता. 28) रात्री अभ्यास करून तिघेही झोपी गेले. बुधवारी पहाटे अचानक आवाजाने साईराज जागा झाला तेव्हा त्याने आकाशला लटकलेल्या अवस्थेत पाहिले आणि आरडा ओरडा केला. साईराज व भागेश आणि जमा झालेल्या विद्यार्थ्यांनी आकाशला खाली उतरवले. रुग्णालयात घेऊन जात असताना याबाबतची माहिती पोलिसांना दिली. आकाशने आत्महत्येपुर्वी लिहीलेली चिठ्ठी पोलिसांना घटनास्थळी सापडली आहे. त्यामध्या माझ्या आत्महत्येला मी सर्वस्वी जबाबदार आहे असा उल्लेख आहे.

दरम्यान, या महिन्यात खासगी वसतीगृहातील 1 व कावेरी वसतीगृहातील 2 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. गेल्या तीन वर्षात सिंहगड संस्थेतील याच कैंपसमध्ये सुमारे दहा आत्महत्या झाल्या आहेत.

Web Title: Sinhagarh college student committed suicide in Pune