सिंहगड घाटातील दरडींची तज्ज्ञांनी पाहणी करावी

Bhimrao-Tapkir
Bhimrao-Tapkir

खडकवासला - सिंहगड घाट रस्त्यावर उबरदांड या ठिकाणी आठवड्यात दोनदा दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांकडून या भागाची पाहणी करून घ्यावी, अशी सूचना आमदार भीमराव तापकीर यांनी बांधकाम विभागाला केली आहे. 

घाट रस्त्यावर कोसळलेल्या दरडीचे तापकीर यांनी नुकतीच पाहणी केली. ते म्हणाले, ‘‘या रस्त्यावर पुढील टप्प्यातील जाळ्या बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून एक कोटी २५ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. पावसाळ्यानंतर ते काम सुरू होईल. आयआयटी मुंबई यांनी यापूर्वी १६ ठिकाणी दरड पडण्याची शक्‍यता वर्तवली होती. त्या ठिकाणी देखील जाळी बसविण्यासह अन्य कामांसाठी निधीची मागणी केली आहे.’’

वन विभागाबाबत नाराजी
८ जुलै रोजी दरड पडल्यानंतरही वन विभागाचे अधिकारी गडावर पाहणी करण्यासाठी आले नाहीत. याबाबत तापकीर यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच गडावर प्रवासी वाहतूक आठ-दहा दिवस बंद ठेवण्याच्या सूचना त्यांनी हवेलीचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com