सिंहगड रस्त्यावरील उड्डाण पूल रखडणार

Sinhgad-Road-Traffic
Sinhgad-Road-Traffic

पुणे - सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी प्रस्तावित उड्डाण पुलाचे काम आता होऊ शकणार नाही. या उड्डाण पुलासाठी अंदाजपत्रकात केलेल्या दहा कोटींपैकी सुमारे आठ कोटी रुपयांची तरतुदीचे वर्गीकरण करण्यात आले आहे.

स्थायी समितीमध्ये या प्रस्तावाला राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने विरोध केला. त्यामुळे सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करून घेतला. सिंहगड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उड्डाण पूल उभारण्यात येणार होता. त्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद केली होती. ही तरतूद प्रभाग क्रमांक ३४ मधील विविध विकासकामांसाठी आणि साडेसात मीटर रुंद डी. पी. रस्त्याच्या कामासाठी ४ कोटी रुपये, पदपथ तयार करणे, सनसिटी येथील भाजी मंडई येथे विविध विकासकामांसाठी निधी वर्ग करण्यात आले. प्रभाग क्रमांक ३० मधील पु. ल. देशपांडे उद्यानासमोर पादचाऱ्यांकरिता भुयारी मार्ग करण्यासाठी दोन कोटी रुपये वर्ग केले गेले. भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे यांनी हा प्रस्ताव दिला होता. याबाबत त्या म्हणाल्या, ‘‘संपूर्ण दहा कोटी रुपयांचा निधी खर्ची पडणार नव्हता. यावर्षी उड्डाण पुलासाठी जेवढी रक्कम आवश्‍यक आहे, तेवढी तरतूद ठेवण्यात आली आहे. सिंहगड रस्त्याला पर्याय ठरणाऱ्या डी.पी. रस्त्याचे काम थांबले असून, त्याकरिता निधी उपलब्ध झाला आहे, त्याचप्रमाणे देशपांडे उद्यानासमोर पादचाऱ्यांकरिता भुयारी मार्ग झाल्याने नागरिकांची रस्ता ओलांडण्यातील अडचण दूर होण्यास मदत होणार आहे.’’ 

राष्ट्रवादीचे सदस्य दिलीप बराटे यांनी एकाच प्रभागात हा निधी वर्ग करण्यास आम्ही विरोध केला होता, असे नमूद केले. सिंहगड रस्त्यावरील कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने हा उड्डाण पूल महत्त्वाचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com