दोघा विद्यार्थ्यांसह सहा चोरट्यांना अटक 

दोघा विद्यार्थ्यांसह सहा चोरट्यांना अटक 

मंचर - मंचर व अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) परिसरात दिवसा व रात्री बंद घरातून चोऱ्या करणाऱ्या व दुचाकी चोरून नेणाऱ्या टोळीतील सहा जणांना मंचर पोलिसांनी अटक केली आहे. चोरट्यांकडून दोन लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल व तीन दुचाकी जप्त केल्या आहेत. त्यापैकी दोन आरोपी जुन्नर तालुक्‍यातील एका महाविद्यालयात मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहेत. अन्य आरोपी अवसरी खुर्द व घोडेगाव येथे राहणारे आहेत. 

दाखल झालेल्या गुन्ह्यात चोरी झालेल्या ऐवजापैकी एक रेसिंग कार, फास्ट ट्रॅक कंपनीचे घड्‌याळ, गॅस टाकी, फ्रीज, एलइडी, एक प्रिंटर आदी मुद्देमाल जप्त केला आहे. शुभम जाधव, आकाश खेडकर, आशिष वाव्हळ, ऋषिकेश भोर यांना पोलिसांनी अटक केली आहे. जयेश रतिलाल बहिरम, अनिकेत चंद्रकांत काळे (दोघे विद्यार्थी) यांना ताब्यात घेतले. 

मंचर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार नवनाथ नाईकडे, अनिल वाघमारे व प्रशांत भुजबळ यांना एका खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता. 13) शुभम गोरक्षनाथ जाधव (रा. अवसरी खुर्द) याला संशयित म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्‍या दाखविल्या नंतर साथीदार आकाश संजय खेडकर, आशिष बाळासाहेब वाव्हळ, ऋषिकेश गोविंद भोर यांच्या मदतीने बंद असलेल्या घरांमधून दिवसा व रात्री चोऱ्या केल्याचे, तसेच दुचाकी चोरून नेल्याची कबुली दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com