देशातील स्मार्ट सिटीची जबाबदारी कुणाल कुमार यांच्याकडे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 मे 2018

पुणे - केंद्र सरकारच्या बहुचर्चित स्मार्ट सिटी प्रकल्पाची जबाबदारी पुणे महापालिकेचे माजी आयुक्त कुणाल कुमार यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली आहे. कुणाल कुमार यांच्या काळातच स्मार्ट सिटीच्या स्पर्धेत पुण्याने दुसरा नंबर पटकविला होता.

कुमार यांची केंद्रातील नगरविकास विभागात बदली झाली होती. त्यांच्याकडे सुरवातीला पंतप्रधान आवास योजनेची जबाबदारी देण्यात आली होती. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी प्रकल्पात पुणे शहराची दुसऱ्या क्रमांकाने निवड झाली. स्मार्ट सिटी प्रकल्पाचे उद्‌घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुण्यात झाले होते. कुमार यांनी आयुक्तपदावर काम करत असताना स्मार्ट सिटीच्या प्रकल्पांना प्राधान्य दिले होते. त्यांच्या पुण्यातील स्मार्ट सिटीच्या कामकाजाचा अनुभव लक्षात घेऊन त्यांना देशातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यातील स्मार्ट सिटी प्रकल्पावर कुमार यांची विशेष नजर असणार आहे. त्यामुळे आता तरी स्मार्ट सिटीचे रखडलेले प्रकल्प मार्गी लागणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Web Title: smart city project kunal kumar