‘स्मार्ट सिटी’चा प्रस्ताव ३१ मार्चला पाठविणार

मिलिंद वैद्य
मंगळवार, 28 मार्च 2017

पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराची केंद्र सरकारच्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेसाठी निवड झाली असली, तरी या योजनेत प्रवेश करण्यासाठी महापालिका आपला प्रस्ताव ३१ मार्चपर्यंत राज्य सरकारकडे पाठविणार आहे. त्या अगोदर महासभेत या विषयावर चर्चा होऊन प्रस्ताव पाठविण्यासंबंधीचा ठराव करावा लागणार आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने महापालिका निवडणुकीपूर्वी पिंपरी-चिंचवड शहराची ‘स्मार्ट सिटी’ योजनेसाठी निवड केली. त्यानंतर निवडचाचणीचे दोन फेऱ्या महापालिकेने पूर्ण केल्या. 
 
शेवटची फेरी पूर्ण झाल्यानंतर शहराचा या योजनेत प्रवेश निश्‍चित होणार आहे. त्यासाठी अंतिम प्रस्ताव ३१ मार्चपर्यंत राज्य सरकारकडे पाठवावा लागणार आहे. राज्य सरकार हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविणार आहे. त्यानंतर पिंपरी-चिंचवडचा या योजनेतील प्रवेश पहिल्या दहा शहरांच्या यादीत होणार की शेवटच्या दहा शहरांच्या यादीत होणार हे केंद्र सरकारकडून निश्‍चित केले जाणार आहे.

दरम्यान, ‘स्मार्ट सिटी’साठी कोणत्या योजना राबवायला हव्यात याविषयी शहरातील नागरिकांकडून ऑनलाइन सूचना मागविण्यात येत आहेत. शुक्रवार (ता. २४) पर्यंत महापालिकेच्या ‘स्मार्ट सिटी’ विभागाकडे ७६ हजारांहून अधिक सूचना आल्या आहेत. त्या ३० मार्चपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. आतापर्यंत आलेल्या सूचनांमध्ये ‘स्टॅन्ड सिटी’ला प्राधान्य दिले आहे. तसेच शहराच्या विविध भागांची निवड ‘स्मार्ट सिटी’साठी केली जावी, अशाही सूचना आहेत.

तसेच ऑनलाइन सूचना पाठविल्याची पोच किंवा प्रतिसाद पालिकेकडून मिळत नसल्याच्या तक्रारी अनेक नागरिकांनी केल्या आहे. 

पिंपळेसौदागरची निवड का?
या योजनेसाठी प्रथमत: पायलट प्रकल्प म्हणून निवडण्यात येणाऱ्या पिंपळे सौदागर व पिंपळे गुरवच्या प्रभागांमध्ये आतापर्यंत सर्वाधिक विकास झाला आहे. आता त्याच ठिकाणी कोणता विकास करणार असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

ऑनलाइन सूचनांना प्रतिसाद 
स्मार्टसिटी योजनेबाबत पुणे महापालिकेने जेवढा प्रचार व प्रसार केला तेवढा पिंपरी-चिंचवड महापालिकेने केला नाही. याबाबत या विभागाचे प्रमुख निळकंठ पोमण म्हणाले, ‘‘पुणे महापालिकेला ‘स्मार्ट सिटी’ योजनेत समावेश होण्याआधी तयारीसाठी तीन महिन्यांचा कालावधी दिला होता. त्या वेळी राष्ट्रीय स्तरावर निवड स्पर्धा होती. पिंपरी-चिंचवड शहराला त्या वेळी वगळण्यात आले आणि आता थेट केंद्राकडूनच निवड जाहीर झाल्याने महापालिकेला प्रचार व प्रसार करायला संधी मिळाली नाही.’’

‘स्मार्ट सिटी’ योजनेची नागरिकांच्या ऑनलाइन सूचना अपेक्षेपेक्षा चांगला प्रतिसाद मिळत आहे. उपयुक्त सूचना, तज्ज्ञांचे मत आणि महासभेत सदस्यांकडून मिळणाऱ्या सूचनांनुसार आराखडा बनवून ३१ मार्चला तो राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल. शंभर शहरांच्या यादीत आपला समावेश कोठे होतो ते पाहावे लागेल. 

- निळकंठ पोमण, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका