एक मुठ वंचितासाठी उपक्रमांमधून 55 पोती धान्यांची मदत

Bhigwan
Bhigwan

भिगवण : येथील रोटरी क्लब ऑफ भिगवणने राबविलेल्या एक मुठ धान्य वंचितासाठी या उपक्रमास भिगवण व परिसरातील 20 शाळांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत समाजातील संवेदनशीलता अजुनही टिकुन असल्याचे दाखवुन दिले.  

या उपक्रमाध्ये 20 शाळांतील मुलांनी 55 पोती धान्य रोटरी क्लबकडे जमा केले तर येथील सचिन फॅन क्लबनेही या उपक्रमास सहभाग घेत 25 हजार रुपयांचे धान्य जमा केले. जमा झालेले धान्य परिसरातील सहा वृध्दाश्रम, अनाथ व मतीमंद विदयालयांना वितरीत करण्यात आले. रोटरीच्या या उपक्रमांमुळे वंचितांना तर मदत मिळाली पण समाजातील संवेदनाही जागृत करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आहे.  

येथील रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या सदस्यांनी परिसरातील अनाथ व मतीमंद मुलांच्या शाळांना भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या अडचणी असल्याचे लक्षात आले. वंचितासाठीच्या संस्थाना मदत व्हावी या हेतुने एक मुठ वंचितासाठी ही अभिनव कल्पना रोटरी क्लबने राबविली. यामध्ये विठ्ठलराव थोरात इंग्लीश स्कुल भिगवण, भैरवनाथ विदयालय भिगवण, आदर्श माध्यमिक विदयालय भिगवण, जिल्हा प्राथमिक शाळा तक्रारवाडी, डिकसळ व पोंधवडी आदी 20 शाळातील मुलांनी 55 पोती धान्य रोटरी क्लबकडे जमा केले. जमा झालेल्या धान्य गरजु संस्थापर्यत पोचविण्याचा कायर्क्रम नुकताच संपन्न झाला. भिगवण रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, अध्यक्ष नामदेव कुदळे, रियाज शेख, संजय चौधरी, संपत बंडगर, डॉ. जयप्रकाश खरड, डॉ. भारत भऱणे, व सचिन फॅन क्लबचे संदीप वाकसे प्रसाद क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी गोविंद वृध्दाश्रम टेंभुर्णी, ज्ञानप्रबोधिनी मतीमंद विदयालय कोर्टी, अविश्री बालसदन दौंड, यशोधरा संस्था बारडगांव, निवासी मतीमंद विदयालय वागज, समर्थ मुकबधीर विदयालय, इंदापुर या संस्थाना जमा झालेल्या धान्याचे वाटप करण्यात आले. 

रियाज शेख म्हणाले, शाळामधील मुले ही संवेदनशील असतात त्यांनाही समाजातील वास्तवाची जाणिव व्हावी व गरजु संस्थांना मदत मिळावी या हेतुने रोटरीच्या वतीने एक मुठ धान्य वंचितासाठी हा उपक्रम राबविला. यामधुन गरजु संस्थांना मदतही मिळेल व विदयाथ्यार्मध्ये सामाजिक बांधिलकी निमार्ण होण्यास मदत होईल. रोटरी क्लबच्या वतीने मिळालेल्या मदतीमुळे संस्थांना धान्याच्या मदतीबरोबरच मायेची ऊबही मिळाली अशी भावना ईश्वर काळे व श्री. उन्हाळे यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक सचिन बोगवात यांनी केले तर आभार औदुंबर हुलगे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन संजय खाडे, कमलेश गांधी, केशव भापकर, कुलदीप ननवरे आदींनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com