रांजणगाव देवस्थान कर्मचाऱयांच्या वतीने चंदू चव्हाण यांचा सत्कार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 मे 2018

पुणे: पाकिस्तानमधून सहिसलामत सुटून भारतात परतलेले जवान चंदू चव्हाण यांचा रांजणगाव देवस्थान कर्मचाऱयांच्या वतीने सत्कार करण्यात आला. परंतु, ट्रस्टने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

एका कार्यक्रमानिमित्त चंदू चव्हाण रांजणगाव देवस्थानमध्ये आले होते. यावेळी कर्मचाऱी संघटनेच्या वतीने चंदू चव्हाण यांचा शाल, श्रीफळ व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. संघटनेचे रमाकांत शेळके, संभाजी शेळके, राम फराटे यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते. सत्काराबद्दल चव्हाण यांनी आभार व्यक्त केले.

देवस्थान ट्रस्टचे दुर्लक्ष...
एका कार्यक्रमानिमित्त चंदू चव्हाण देवस्थान मंदिरामध्ये उपस्थित राहणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टला देण्यात आली होती. परंतु, देवस्थान ट्रस्टच्या वतीने कोणीही उपस्थित तर नव्हतेच पण साधी दखलही घेतली गेली नाही. देवस्थान ट्रस्टमधील कर्मचाऱयांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी पुढाकार घेऊन सत्कार केला. देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. संतोष दुंडे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. परंतु, त्यांनी मोबाईल उचलला नाही.

रविवार व सुटी असल्यामुळे महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सुटीनिमित्त अनेक मान्यवर मंदिरात येतात. राजकीय अथवा कलाकार दर्शनासाठी अल्यानंतर त्यांचा ट्रस्टच्या वतीने मोठा सत्कार केला जातो. परंतु, जवान चव्हाण येणार असल्याची माहिती असूनही जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

Web Title: soldier chandu chavan felicitated on behalf of ranjangaon devasthan employees