साखर उद्योगासमोरील समस्या सोडवा - शरद पवार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

पुणे - ‘‘देशातील पाच कोटी ऊस उत्पादक शेतकरी साखर उद्योगावर अवलंबून आहेत. या उद्योगाची वार्षिक उलाढाल ८०० अब्ज रुपयांची आहे. कृषी क्षेत्रातील या उद्योगासमोरील समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने अधिक लक्ष द्यावे,’’ अशी अपेक्षा माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी रविवारी व्यक्त केली. 

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील (व्हीएसआय) आंतरराष्ट्रीय ऊस परिषदेचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी पवार बोलत होते. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

‘व्हीएसआय’च्या उभारणीचा उद्देश, त्यातील नावीन्यपूर्ण संशोधन, तंत्रज्ञान आणि परिणामकारकतेची माहिती देत पवार यांनी ‘व्हीएसआय’च्या भविष्यातील वाटचालीची दिशा स्पष्ट केली. 

पवार म्हणाले, ‘‘सततचा दुष्काळ आणि क्षारपड जमिनींचा प्रश्‍न गंभीर आहे, त्याचा परिणाम ऊस उत्पादनावर होत आहे. परिणामी, शेतकरी अडचणीत येत असून, त्यांच्या सर्व समस्यांवर एकत्रित अभ्यास करण्याची गरज आहे. प्रतिहेक्‍टरी ऊस उत्पादन आणि सरासरी साखर उताऱ्यात वाढ करावी लागणार आहे. ऊस संशोधनाच्या क्षेत्रात ‘व्हीएसआय’चे वेगवेगळ्या पातळ्यांवर काम सुरू आहे. या कामांना चालना देण्यासाठी केंद्राने सहकार्य करावे. तसे झाल्यास देशातील ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योगाला प्रोत्साहन मिळेल. साखर आणि उपउत्पादने ही काळाची गरज आहे.’’ 

इथेनॉलनिर्मिती वाढत असतानाच या प्रक्रियेला प्रोत्साहन देण्याची आवश्‍यकता असल्याचेही पवार यांनी सांगितले. 

इथेनॉलवर चालणार बसगाड्या
‘‘राज्यात गेल्या काही वर्षांत वाढलेल्या साखर उद्योगावर दुष्काळामुळे संकट ओढावले आहे. मात्र, राज्य आणि केंद्र सरकारच्या सहकार्यामुळे हा उद्योग पुन्हा उभा राहातो,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. इथेनॉलचा वापर वाढविल्यास साखर उद्योगाला हातभार लागणार असल्याची आशाही त्यांनी व्यक्त केली. 

ते म्हणाले, ‘‘राज्यात अनेक छोटे-मोठे उद्योग आहेत, त्यांची परिणामकारकता वाढविण्याची गरज आहे. त्यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यात महिलांसाठी २०० बसगाड्या उपलब्ध करून देण्याचे नियोजन सरकारने केले आहे. या बसगाड्या इथेनॉलवर चालणार आहेत.’’

ओळखपत्रांची तपासणी
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील आंतरराष्ट्रीय ऊस परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार असल्याने तेथील आवारात दुपारपासूनच नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. निमंत्रितांना संस्थेच्या एकाच प्रवेशद्वारातून प्रवेश देण्यात येत होता. तेथेही प्रत्येकाकडील निमंत्रणपत्रिका, ओळखपत्राची खातरजमा करूनच आत सोडण्यात आले. संस्थेच्या आवारासह परिसरात सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त होता.

पुणे

टाकळी हाजी (ता. शिरूर, जि. पुणे): शिरूर तालुक्‍यातील पश्‍चिम भागात श्रावणी बैलपोळ्यानिमित्त ठिकठिकाणी बैलांना सजवून त्यांची वाजत...

08.09 PM

तळेगाव दिघे (जि. नगर) संगमनेर येथील गीता परिवार संचालित संस्कार बालभवनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'मातीतून घडवू गणेश’...

04.00 PM

खडकवासला : धरण क्षेत्रात रविवारी सकाळी विक्रमी पाऊस पडला असून, 24 तासात 60 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पानशेत धरण 100 टक्के...

10.48 AM