वडिलांचा डोक्‍यात दगड घालून केला खून

file photo
file photo

शिरूर: व्यसनाधीन वडील, आईला कायम शिवीगाळ व मारहाण करीत असल्याचा राग डोक्‍यात धरून मुलानेच आपल्या वडिलांचा डोक्‍यात दगड घालून खून केला. कवठे येमाई (ता. शिरूर) जवळील वागदरे वस्ती येथे काल (ता. 4) रात्री साडेअकराच्या सुमारास हा प्रकार घडला.

दादाभाऊ भगवंता वागदरे (वय 65, रा. वागदरे वस्ती, कवठे येमाई) असे खून झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. मृत वागदरे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई दादाभाऊ वागदरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर पोलिसांनी सोमनाथ दादाभाऊ वागदरे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, दादाभाऊ वागदरे हे पत्नी लक्ष्मीबाई तसेच सोमनाथ व रामदास या मुलांसह कवठे येमाई जवळील वागदरे वस्ती येथे राहण्यास असून, शेती करून हे कुटुंब उपजीविका चालवीत होते. दादाभाऊ यांना दारूचे व इतर व्यसन असल्याने ते गेल्या तीन-चार वर्षांपासून, नशेत अनेकदा पत्नी व मुलांना मारहाण करीत असत. सततच्या मारहाणीला कंटाळून लक्ष्मीबाई या तीन महिन्यांपूर्वी आपल्या माहेरी इचकेवाडी (कवठे येमाई) येथे भाऊ शंकर भिकाजी इचके यांच्याकडे राहण्यास गेल्या होत्या. यात्रेच्या निमीत्ताने तीन दिवसांपूर्वी त्या परत वागदरे वस्ती येथे घरी आल्या होत्या. दरम्यान, काल दिवसभर चुलत दीर भीमा वागदरे यांच्या शेतात काम करून संध्याकाळी घरी आल्या असता दादाभाऊ वागदरे यांनी रात्री साडेआठच्या सुमारास, तु भीमाच्या शेतात खुरपायला का गेलीस, असे म्हणत मारहाण करण्यास सुरवात केली. लक्ष्मीबाई यांच्या सासू ताराबाई भगवंता वागदरे या भांडण सोडविण्यास गेल्या असता, दादाभाऊंनी त्यांचे देखील ऐकले नाही. मुलगा सोमनाथ हा भांडणे सोडविण्यास गेला असता, दादाभाऊंनी त्यालाही शिवीगाळ केली व परत लक्ष्मीबाईंना मारहाण करू लागला. त्यामुळे रागावलेल्या सोमनाथने त्यांना बांबूने मारहाण केली. त्याचवेळी लक्ष्मीबाई यांचे भाचे दादाभाऊ इचके व सतीश इचके हे आले व त्यांनी भांडणे सोडवून जखमी अवस्थेतील दादाभाऊ यांना घराबाहेरील खाटेवर झोपविले व ते निघून गेले.

दरम्यान, रात्री साडेअकराच्या सुमारास झोपेतून उठलेल्या दादाभाऊ यांनी सोमनाथ याला, मारहाणीचा जाब विचारून परत शिवीगाळ केली. लक्ष्मीबाई यांनाही ते परत मारहाण करू लागल्याने सोमनाथ यांनी त्यांना लोखंडी गजाने मारहाण केली. मारहाणीमुळे ते खाली पडल्यावर जवळच पडलेला दगड त्याने त्यांच्या डोक्‍यात घातला. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती कळताच, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, शिरूरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र कुंटे यांनी घटनास्थळी भेट दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com