भरतनाट्यम, फ्लेमिंकोतून उलगडले नवरसांचे अंतरंग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 जानेवारी 2017

पुणे : स्पॅनिश बॅले, भरतनाट्यम आणि फ्लेमिंको या नृत्याविष्कारातून प्रेम, भय, करुणा, दु:ख, आनंद आदी नवरसांचे अंतरंग रसिकांसमोर उलगडले. पदन्यास आणि हस्ततालाच्या अविस्मरणीय सादरीकरणाने उपस्थित रसिक आकंड बुडाले. 

पुणे : स्पॅनिश बॅले, भरतनाट्यम आणि फ्लेमिंको या नृत्याविष्कारातून प्रेम, भय, करुणा, दु:ख, आनंद आदी नवरसांचे अंतरंग रसिकांसमोर उलगडले. पदन्यास आणि हस्ततालाच्या अविस्मरणीय सादरीकरणाने उपस्थित रसिक आकंड बुडाले. 

अखिल भारतीय सांस्कृतिक संघ आणि कासा दे ला इंडियातर्फे आयोजित "नृत्यरस' कार्यक्रमात नृत्यांगना राजसी वाघ, स्पेनमधील नृत्यांगना मोनिका दे ला फ्युएंते यांनी नृत्याचे सादरीकरण केले. ज्येष्ठ व्यंग्यचित्रकार मंगेश तेंडुलकर, प्राप्तिकर आयुक्त संग्राम गायकवाड, अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या संचालिका रत्ना वाघ, कासा दे ला इंडियाचे संचालक गिर्लेमो रॉड्रिग्ज, हेमंत वाघ आदी उपस्थित होते. या वेळी रॉड्रिग्ज यांचा पुणेरी पगडी देऊन सन्मान करण्यात आला. मोनिका यांना नृत्यनिवेदिका पुरस्काराने गौरविण्यात आले. 

राजसी यांनी भरतनाट्यममधील विविध मुद्रांमधून प्रेम, शृंगार अशा विविध रागांचे सादरीकरण केले. मोनिका यांनी पदन्यास, टाळ्या अन्‌ शारीरिक हालचालींचा उत्कृष्ट मेळ साधत फ्लेमिंको नृत्यामधून विरह, करुणा भावनांचे सादरीकरण केले. त्यांनी सादर केलेल्या "फुलपाखरू' मुद्रा आणि संगीताच्या ठेक्‍यावर सादर केलेल्या शास्त्रीय नृत्यास रसिकांनी विशेष दाद दिली. त्यांना सुब्रतो डे (सतार), कार्लोस ब्लांको (गिटार), मनोज चांदेकर (तबला) यांनी साथसंगत केली.