जवळार्जुनच्या शाळेला खेळाचे साहित्य भेट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 ऑक्टोबर 2016

जेजुरी : सामाजिक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शिवाजीनगर पुणे येथील एलआयसी ग्रुपच्या वतीने जवळार्जुन (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पुस्तके व खेळाचे साहित्य भेट देण्यात आले.

जेजुरी : सामाजिक सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने शिवाजीनगर पुणे येथील एलआयसी ग्रुपच्या वतीने जवळार्जुन (ता. पुरंदर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत पुस्तके व खेळाचे साहित्य भेट देण्यात आले.

ग्रुपचे विभागीय उपाध्यक्ष नीलेश शेटे, व्यवस्थापक कमलजी देसाई, जयंत पाचपोर, राजश्री सुळे, सुनीता बोरसे, सतीश हांडे, विजय दहीवडे यांनी यासाठी पुढाकार घेतला. सुमारे पन्नास पुस्तके शाळेच्या वाचनालयासाठी भेट दिली. व्हॉलिबॉल, फुटबॉल, दोरी उड्या, बुद्धिबळ संच, ब्लॅंकेट व पुस्तके आदी साहित्य देऊन मुलांना खाऊवाटप करण्यात आले. शेटे व देसाई यांनी मुलांशी संवाद साधला. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ टेकवडे, उपाध्यक्ष वनिता टेकवडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अप्पा राणे, उपसरपंच शिवाजी राणे, नवनाथ राणे, अशोक खोमणे, मोहन टेकवडे, गोपीचंद टेकवडे, सारिका टेकवडे, रूपाली टेकवडे, शीतल टेकवडे आदी उपस्थित होते. मुख्याध्यापक मारुती शेंडकर यांनी प्रास्ताविक केले. अहिल्या शेंडकर यांनी सूत्रसंचालन केले. सोमनाथ जाधव यांनी आभार मानले.