दहावीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

पुणे - दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प देत अनेक परीक्षा केंद्रांवर केलेले स्वागत... परीक्षा केंद्रावरील अधिकारी, शिक्षक वर्गाने विद्यार्थ्यांना दिलेल्या शुभेच्छा अन्‌ घरोघरी मुलांच्या हातावर दही-साखर ठेवून "नीट पेपर लिहा', "टेन्शन घेऊ नकोस', असा आई-बाबांनी दिलेला सल्ला वजा आधार. हे चित्र मंगळवारी दिसून आले. 

शालेय जीवनातील शेवटची आणि करियरच्या दृष्टिकोनातून पहिल्या टप्प्यावरील महत्त्वपूर्ण परीक्षा म्हणून दहावीकडे पाहिले जाते. दहावीचा पहिला पेपर असल्यामुळे अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे औक्षण केले. आपल्या मुलांना परीक्षा केंद्रावर सोडण्यासाठी पालकांनी गर्दी केली होती. मुलांची दहावीची परीक्षा असल्यामुळे काही पालकांनी खास रजाही काढल्याचे सांगितले. पेपर सुटेपर्यंत काही पालक परीक्षा केंद्राबाहेर थांबले होते. शहरातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यांचे स्वागत आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कार्यक्रम आयोजित केले होते. 

शुक्रवार पेठेतील सरस्वती मंदिर संस्थेतील शाळेतील परीक्षा केंद्रावर येणाऱ्या विद्यार्थ्यांचे औक्षण केले आणि त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. 

काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षेदरम्यान होणारे "कॉपी'चे आणि पेपरफुटीचे प्रकार दहावीच्या परीक्षेत होऊ नयेत, म्हणून यासाठी कडक बंदोबस्त ठेवण्याला राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाने प्राधान्य दिले आहे.

Web Title: SSC students welcome