वालचंदनगरची एसटी बससेवा तीन दिवसांपासून बंद

stand
stand

वालचंदनगर (पुणे) : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे तीन दिवसांपासुन एसटी बससेवा बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

वालचंदनगरमध्ये बुधवारी (ता.23) बंदचे आवाहन करण्यात आले होते. बंदच्या काळामध्ये अत्यावश्‍यक सेवा सुरु होत्या. सकाळी एसटी बसही सुरु होत्या. मात्र अकरा वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने एसटी बसवर दगडफेक केल्याने  एस.टी.महामंडळाच्या बारामती, इंदापूर डेपोने तातडीने एसटी बससेवा बंद केली. तसेच वालचंदनगर मार्गे अकलुज, नातेपुतेकडे जाणाऱ्या सर्व गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले आहेत.

बुधवारी (ता.23) पासून बंद झालेले एसटीच्या बस अाज शुक्रवार (ता. 25) पर्यंत ही सुरु नव्हत्या. वालचंदनगर नियमित मध्ये ये-जा करणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तसेच वालचंदनगरमधून अनेक कामगार कामासाठी बारामती, इंदापूर व नातेपुतेमध्ये जात असतात. येथे अनेक विद्यालय, महाविद्यालये असल्यामुळे विद्यार्थी शिकवणीसाठी येत असल्याने त्यांची गैरसोय झाली आहे.  

एसटी बसमध्ये बंद असल्याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून नागरिकांना ये-जा करण्यासाठी खासगी वाहनांचा वापर करावा लागत आहे.यासंदर्भात इंदापूर डेपो आगारव्यवस्थापक एस.अे.येळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, बुधवार(ता.२३) रोजी वालचंदगरमध्ये बसवरती दगडफेक झाली असून बसच्या चालक हे जखमी झाले आहेत.बारामती,अकलूज आगारप्रमुखांशी बोलून बससेवा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.बारामती आगाराचे प्रमुख अमोल गोंजारे यांच्या संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,एटी सेवा सुरु करण्यासाठी स्थानिक प्रशासनाचे सहकार्य गरजेेचे असुन लवकर बस सेवा सुरु करण्याचे आश्‍वासन दिले.

एसटी बस सेवा सुरु करा- संतोष भिसे, अध्यक्ष मनसे, इंदापूर तालुका

दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष संतोष भिसे यांनी बारामती,इंदापूर आगाराच्या प्रमुखांशी बोलून तातडीने बस सेवा सुरु करण्याची मागणी करुन प्रशासनाला  हवे ते सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले आहे. बससेवा सुरु करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज असल्याचे शिवसेनेेचे माजी तालुका प्रमुख योगशे कणसे यांनी  सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com