dapodi
dapodi

पुणे - सांगवी दापोडी पुल रस्त्यावरील चेंबर दुरूस्ती कामास सुरूवात

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवी दापोडी पुल ते एस.टी.कार्यशाळा रस्त्यावरील खड्डेमय चेंबरच्या दुरूस्तीचे काम सुरू करण्यात आले असुन येथील चेंबरला सिमेंटची झाकणे बसविण्यात आली आहेत.  

सांगवी दापोडी रस्त्यावरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुल ते दापोडी येथील एस.टी.कार्यशाळा वळण येथील सुमारे पाचशे मिटर अंतराचा खराब रस्त्याचे प्रशासनाकडुन डांबरीकरण करण्यात आले होते. या कामादरम्यान रस्त्याकडेला असलेले चेंबर रस्त्याची उंची वाढल्याने खाली जाऊन रस्ता खड्डेमय झाला होता. वाहन चालक व पादचाऱ्यांना या परिसरातील अंधुक प्रकाशामुळे हे खड्डेमय चेंबर लवकर नजरेस येत नव्हते. यामुळे गाड्या आदळणे, किरकोळ अपघाताच्या घटनांना नागरीकांना सामोरे जावे लागत होते. या रस्त्यावरून भोसरी, पिंपरी आदी भागात मोठ्या प्रमाणात महिला कामगार कामाला जातात.

अनेकजण अंतर कमी असल्याणे पायी चालत येजा करतात. येथील अंधुक प्रकाश व चेंबरच्या खड्ड्याबाबत महिला व नागरीकांच्या तक्रारी होत्या.याबाबत सकाळ मधुन रविवार ता.८ बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. याची प्रशासनाकडुन तात्काळ दखल घेत येथील चेंबरवर झाकणे बसवुन रस्त्याला समातंर घेण्यात येत असल्याने नागरीकांमधुन समाधान व्यक्त केले जात आहे. याबाबत नगरसेविका माई काटे म्हणाल्या,"लवकरच या परिसरात नविन एलईडी दिवे बसविण्यात येतील दिवे  बसविण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू"

सकाळच्या बातमीचा परिणाम म्हणून सांगवी दापोडी पुल रस्त्यावरील खड्डेमय चेंबरची झाकणे बसविण्याच्या कामास सुरूवात झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com