अन्नधान्याचे अनुदान सोडण्याच्या योजनेला प्रारंभ 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 9 जानेवारी 2017

पुणे - गॅस सबसिडीच्या धर्तीवर "अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा' अशी योजना राज्य सरकारने सुरू केली असून, त्याअंतर्गत पुण्यातील दोन कुटुंबांनी अन्नधान्यासाठीचे अनुदान सोडले आहे. 

पुणे - गॅस सबसिडीच्या धर्तीवर "अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा' अशी योजना राज्य सरकारने सुरू केली असून, त्याअंतर्गत पुण्यातील दोन कुटुंबांनी अन्नधान्यासाठीचे अनुदान सोडले आहे. 

अन्नधान्य वितरण कार्यालयांतर्गत "ह' परिमंडळातील शांताबाई कांबळे (रा. प्रेमनगर, मार्केट यार्ड, पुणे) आणि सुनीता पाटोळे (रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड) यांनी अन्नधान्य अनुदानातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. जय तुळजाभवानी महिला बचत गट या स्वस्त धान्य दुकानात त्यांच्या शिधापत्रिका होत्या. त्याबाबतचा अर्ज त्यांनी अन्नधान्य वितरण अधिकारी शहाजी पवार, परिमंडळ अधिकारी गीतांजली गरड यांच्याकडे सुपूर्द केला. 

केशरी शिधापत्रिकाधारकांसाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत शहर आणि जिल्ह्यातील ज्या नागरिकांना स्वस्त धान्य नको आहे, त्यांनी त्यासाठीचा अर्ज भरून दिला, तर त्यांचे धान्य अन्य गरजूंना देता येईल, असा या योजनेमागील उद्देश आहे. 30 डिसेंबरला या योजनेला शहरात प्रारंभ झाला आहे. अन्नधान्याच्या अनुदानातून बाहेर पडा, या योजनेसाठीचे अर्ज शहरातील सर्व स्वस्त धान्य दुकानांत उपलब्ध आहेत, असेही अन्नधान्य वितरण विभागाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स

पुणे

पुणे - राष्ट्रीय महामार्गाचे पुणे विभागातील प्रलंबित प्रकल्प, सुरू असलेले प्रकल्प आणि पुढील काळात येऊ घातलेले प्रकल्प मार्गी...

03.03 AM

पिंपरी  - लोकसभा निवडणुकीला सव्वावर्षांपेक्षा जास्त कालावधी असताना केवळ आपली धास्ती घेतल्यामुळे लक्ष्मण जगताप उसने...

02.42 AM

पुणे - शहर आणि परिसरात येत्या गुरुवारी (ता. 21) पावसाच्या काही सरी पडण्याची शक्‍यता हवामान खात्याने बुधवारी व्यक्त केली. शहरात...

02.03 AM