शिर्सुफळ फाटा ते सिध्देश्वर निंबोडी रस्ता दुरुस्तीचे काम सुरु

shirsufal
shirsufal

शिर्सुफळ - बारामती दौंड मार्गावरील शिर्सुफळ फाटा ते सिध्देश्वर निंबोडी या मार्गाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरवात झाली यासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षापासुन दुरावस्था असलेल्या मार्गाची दुरुस्ती होणार आहे.यामुळे प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

सासवड ते भिगवण या प्राथमिक जिल्हा मार्ग 61 वरील शिर्सुफळ ते भिगवण या मार्गाची प्रचंड दुरावस्था झाली.यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती.याबाबत दै.  सकाळ मध्ये सचित्र वृत्त प्रसिध्द झाले होते.याची दखल घेत या मार्गाच्या दुरुस्तीसाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या कामाला सुरवात झाली आहे.यामध्ये चार ठिकाणी नविन पुल तयार करणे, डांबरीकरण व साईड पट्ट्या दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.यामुळे प्रवाशी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.

पाठपुराव्याला यश...
रस्त्याच्या दुरावस्थेबाबत भारतीय जनता पक्षाचे बारामती तालुका सरचिटणीस अभिमन्यू गुळुमकर यांनी शासकीय पातळीवर वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला. त्यानुरुप बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री शिरीष बापट यांच्या माध्यमातुन तीन कोटी रुपयांचा निधी मंजुर केल्याचे गुळुमकर यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com