पुणे - शिर्सुफळच्या शिरसाई देवी यात्रेला उत्साहात सुरवात

संतोष आटोळे 
गुरुवार, 19 एप्रिल 2018

शिर्सुफळ (पुणे) : संपूर्ण राज्यात एक जागृत देवस्थान म्हणुन प्रसिध्द असलेल्या व माकडांना देव मानणाऱ्या बारामती तालुक्यातील शिर्सुफळ येथील श्री शिरसाई देवी यात्रेला आज गुरुवारी (ता.19) मोठ्या उत्साहात सुरवात झाली.पहाटे महापुजा झाल्यानंतर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.

येथील श्री शिरसाई देवी यात्रोत्सवाबाबत सोमवारी (ता.09) रोजी सकाळी घटस्थापनेने यात्रेला सुरवात झाली. पाचव्या माळे दिवशी पासुन वाघ्यामुरळीचा कार्यक्रम व देवीचा छबीना मंदिर प्रदिक्षणेसाठी काढण्यात आला. मंगळवार (ता.17) रोजी रोजी घटविर्सजन करण्यात आले.या कालावधीत मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले. त्यानंतर आज गुरुवार यात्रेच्या पहिल्या दिवशी गुरुवारी पहाटे देवीची महापुजा झाली व त्यानंतर देवी दर्शन, चोळीपातळ व दंडवत पार पडले यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली आहे. तर संध्याकाळी परिसरातील विविध गावांच्या देवतांचे छबिने येणार आहेत.मध्यरात्री परंपरेप्रमाणे रावणगाव (ता.दौंड) यांचा नेत्रदिपक असा राक्षसदहन कार्यक्रम होणार आहे.

तर शुक्रवार (ता.20) रोजी पहाटे पालखी गाव प्रदक्षिणेसाठी निघुन दुपारी मंदिरात विसावेल. या दोन दिवसाच्या कालखंडात शुक्रवार दुपारी तुकाराम खेडकरसह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर व संध्याकाळी रघुवीर खेडकर यांच्या लोकनाट्य तमाशाच्या मनोरंजन कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे. यात्राकाळात पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, रस्ते, याबाबत भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेतली जात आहे.तर मंदिर परिसरात सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत.

Web Title: starting a yatra of shirsufal of Goddess shirsai