dhanaji.
dhanaji.

टाकवे बुद्रुक - गणेश विसर्जनाच्या वेळी विहीरीत विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू 

टाकवे बुद्रुक - गणेश विसर्जनाच्या वेळी सटवाईवाडीच्या विहीरीत सूर मारलेल्या अकरावीच्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला, धनाजी काळू गवारी असे या दुर्देवी विद्यार्थ्याचे नाव आहे. 

वडेश्वर जवळील सटवाईवाडी सह्याद्रीच्या डोंगरावर बसलेली आदिवासी वाडी आहे. शुक्रवारी ता.२१ दुपारी चारच्या सुमारास येथील सटवाई सेवा तरूण मंडळाच्या सार्वजनिक गणरायाची विसर्जन मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात निघाली. धनाजी मंडळातील उत्कृष्ट ढोल व ताशा वाजवायचा. विसर्जन मिरवणुकीतही काही वेळा पूर्वी तो ढोल वाजवित होता. विहीरीजवळ मिरवणूक पोहचल्यावर धनाजी सह गावातील इतर काही तरूण मिरवणुकीतून पुढे आले. वाडीच्या वरच्या अंगाला असलेल्या विहीरीत त्यांनी पोहण्यासाठी सूर मारले. इतर तरुणांनी सूर मारले पण लवकरच पाण्यावर तरंगले पण धनाजी सूर मारूनही तो पाण्यात वर आला नाही. त्यामुळे तेथे एकच भीती आणि गोंधळ उडला. वाडीतील इतर पोहणा-या तरुणांनी विहिरीच्या तळाला जाऊन धनाजीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण हा प्रयत्न अयशस्वी झाला. 

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. रात्री उशिरा धनाजीचा शोध सुरू होता. अखेर शनिवार ता.२२ला सकाळी १०च्या सुमारास धनाजीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. धनाजी घरातील मोठा मुलगा होता. त्याच्या पश्चात आई वडील, लहान भाऊ व बहीण असा परिवार आई वडीलांच्या आक्रोशाने उपस्थितांचे डोळे पाणावले. धनाजी वडेश्वरच्या शासकीय आश्रम शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी कला शाखेत शिकत होता. प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. धनाजीने सूर मारल्याने विहिरीतील दगड किंवा खडकाचा जोराचा मार त्याच्या नाकाला लागल्याचे दिसून आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com