आयुष्यात विद्यार्थीच राहायचे आहे - हरिप्रसाद चौरसिया

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

पुणे - ‘‘मला आयुष्यात विद्यार्थीच राहायचे आहे. कारण मी आजही सतत काही ना काही शिकत आहे. आपल्यातील विद्यार्थी जागृत ठेवला की नवी क्षितिजे उलगडत जातात. आतातरी माझी गुरू व्हायची इच्छा नाही पुढच्या जन्मी त्याचा विचार करीन. मला आता विद्यार्थी राहायलाच आवडेल,’’ अशी भावना बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरसिया यांनी शनिवारी व्यक्त केली. 

सौरभ फ्ल्युट ॲकॅडमीचे उद्‌घाटन चौरसिया यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्यांनी आपल्या बासरीच्या जगतातला सुरेल प्रवास उलगडला. त्यांनी शास्त्रीय संगीत या विषयावर मनसोक्त गप्पा मारल्या. बासरीवादनातील अनुभवांसह नव्या बदलांचा अनुभवही त्यांनी या वेळी सांगितला. तालयोगी पं. सुरेश तळवलकर, ॲकॅडमीचे सौरभ वर्तक या वेळी उपस्थित होते.

चौरसिया म्हणाले, ‘‘आपल्या आयुष्यात गुरूला मोठे महत्त्व असते. गुरूच्या शिकवणीमुळेच शिष्य मोठा होतो. म्हणूनच गुरू हा सर्वश्रेष्ठ आहे. संगीत क्षेत्रातील नवी पिढी सतत काहीन्‌ काही नवे शिकण्यावर भर देते ही चांगली गोष्ट आहे. त्यांना लवकर प्रसिद्धी मिळतेय हेही चांगले आहे. त्यांच्यात ऊर्मी आणि टॅलेंट आहे. याचा उपयोग ते करत आहेत ही गोष्ट आम्हालाही नवं काहीतरी शिकायला प्रेरित करते.’’ तळवलकर म्हणाले, ‘‘हरिप्रसाद चौरसिया हे सिद्धहस्त आहेत. त्यांच्याकडे शिकणे खूप मोलाचे आहे. त्यांनी प्राप्त केलेल्या सिद्धीचा प्रत्येकाला मोह आहे.’’ 

Web Title: student hariprasad chaurasia