पंधरा हजार विद्यार्थ्यांनी दिली एमएच- सीईटी लॉ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

पुणे - बारावीनंतर करण्यात येणाऱ्या विधी महाविद्यालयातील पाच वर्षांच्या (बीएसएल) अभ्यासक्रमासाठी राज्यातील जवळपास १५ हजार ८८ विद्यार्थ्यांनी रविवारी सामाईक प्रवेश परीक्षा (एमएच- सीईटी लॉ) दिली. या परीक्षेसाठी १० टक्के विद्यार्थी अनुपस्थित होते. 

राज्यातील जवळपास १५० विधी महाविद्यालयांमधील सुमारे नऊ हजार जागांवरील प्रवेशासाठी ही परीक्षा घेण्यात आली. यासाठी १६ हजार ५८१ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, त्यापैकी १५ हजार ८८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ओळखपत्र सोबत ठेवणे सक्तीचे केले होते. कोल्हापूर, नाशिक येथे काही विद्यार्थ्यांजवळ ओळखपत्र नसल्याने त्यांना परीक्षा देता आली नाही. दोन वर्षांपासून राज्यातील विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश या परीक्षेच्या माध्यमातून होत आहेत.

Web Title: student MH-CET Law exam