मंचर- शासकीय अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी बनवली सौरऊर्जेवर चालणारी कार

students of govt engineering college avsari designed solar car
students of govt engineering college avsari designed solar car

मंचर : अवसरी खुर्द (ता.आंबेगांव ) येथील शासकीय अभियांत्रिकी व संशोधन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सोलर कार चँपियनशिप स्पर्धेत भाग घेतला. तयार केलेल्या सोलर कारला 'टीम स्पिरिट' परितोषिक व पाच हजार रुपयाचा धनादेश मिळाला. 

गुजरात येथील मोटरस्पोर्ट तर्फे नॅशनल सोलर कार चँपियनशिप (NSVC) सिज़न दोन रेसिंग स्पर्धा ता. 18 ते 22 मार्च 2018 या कालावधीत आयोजित करण्यात आल्या होत्या. देशातील 40 अभियांत्रिकी महाविद्यालयतील संघानी स्पर्धेत भाग घेतला होता. अवसरी खुर्द महाविद्यालयाच्या द्वितीय आणि तृतीय वर्षामधील यंत्रविभाग, अनुविदयुत अणि दूरसंचार विभाग, स्वयंचालित विभागातील 35 विदयार्थ्यांनी सोलर कार तयार केली. ही कार पर्यावरणाला खूप पूरक आहे. यामुळे इंधनाचा वापर कमी केला जाईल आणि कधी न संपणाऱ्या सुर्यासारख्या स्त्रोताचा चांगला वापर होईल, असे संघप्रमुख नीरज वाणी या विद्यार्थ्यांने सांगितले.  

या कारची लांबी 81 इंच उंची 45 इंच असून वजन 262 किलो इतके आहे. ताशी चाळीस किलोमीटर कार अंतर कापू शकते. या कारसाठी एक लाख वीस हजार रुपये खर्च आला असून कार सोलर पैनेल, बैटरी, बी.ल.डी.सी मोटार उपकरणे वापरली आहेत. प्राचार्य डॉ. अविनाश पंत यांनी विध्यार्थ्यांच्या कामगिरीचे कौतुक केले. ते म्हणाले, '' विद्यार्थ्यानी या चँपियनशिपमध्ये पहिल्यांदाच भाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या कष्टाला फळ मिळाले. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी यश संपादन केले. सद्यस्थितीत जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे त्याप्रमाणात उर्जेची गरज वाढत आहे. सौर ऊर्जा स्त्रोत हे निसर्गाला कोणतीही हानी पोहचवत नाही. सौरऊर्जेवर चालणाऱ्या कारच्या वापरामुळे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर कमी होईल.'' 

शुभम अरगड़े, आकाश पाटील,वैभम बावीसकर, सुरज खेड़कर,प्रतिक सुतार, सुरज गायकवाड़,अंकित इंगले,रोहन सोनवणे,रितेश उतेकर ,सागर नारखेड़े, प्राजक्ता जाधव,प्रतिज्ञा कणसे, दीप्ती पवार,सायली मस्के, पूजा काटकर,शुभम मेहर, स्नेहल वखारे, गायत्री हांडगे, सर्वदा कुंभार, गणेश बागल, स्वप्निल गाडगे, सायली कांगने, भास्कर पाटील ,हीना मुलानी, संदेश खैरनार, प्रज्वल राठौड़, जयराज बिटके, कविता शर्मा या विद्यार्थ्यांनी सोलर कार तयार केली. प्रा.एस.व्ही.जोशी, डॉ.एम.एस.नागमोडे, डॉ.एस.व्ही.करमारे ,प्रा. ए.एस. कौशल यांचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन मिळाले.      

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com