विद्यार्थिनींना वाचवून "तो' देवाघरी !

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 सप्टेंबर 2016

पुणे - उण्यापुऱ्या 32 वर्षांचा होता विनोद. आपलं छोटसं कुटुंबं आणि रोजीरोटी देणारं काम, याच दैनंदिनीत इतर कुणाही सारखा त्याचाही दिवस संपायचा. गुरुवारी मात्र त्याचा काळच आला होता. रोजच्यासारखी आपली ड्यूटी करत शाळेच्या विद्यार्थिनींना बसमध्ये बसवून तो निघाला; पण थोड्याच अंतरावर त्याला हृदयाचा तीव्र झटका आला. अशाही स्थितीत प्रसंगावधान राखत त्याने बस थांबवली अन्‌ विद्यार्थिनींचे प्राण वाचवले... पण विद्यार्थिनींना जीवदान देणारा विनोद स्वतःला मात्र वाचवू शकला नाही... तो देवाघरी गेला... 

पीएमपीमध्ये पूर्णवेळ चालक म्हणून नोकरीस असणाऱ्या विनोद एकनाथ कोंडे या तरुणाचा गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्‍याने अंत झाला. रेणुका स्वरूप मुलींच्या शाळेतून वडगाव बुद्रुकपर्यंत विद्यार्थिनींची ने-आण करण्याची ड्यूटी विनोद करत असे.

विद्यार्थिनींना सकाळी शाळेत सोडून सायंकाळी शाळेतून परत आणणे, हे त्याच्या कामाचे स्वरूप होते. 

गुरुवारी सायंकाळी विद्यार्थिनींना शाळेतून परत नेताना साडेसहा वाजेच्या सुमारास सारसबागेजवळ महालक्ष्मी मंदिराच्या पुढे बस असताना विनोदच्या छातीत दुखू लागले. पण त्याही परिस्थितीत प्रसंगावधान राखत त्याने पुढे जाऊन सुरक्षितपणे गाडी थांबवली. त्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला उपचारांसाठी तातडीने खासगी रुग्णालयात काही नागरिकांनी नेले. मात्र, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. 

टॅग्स