अभ्यासाचा पाया पक्का होणे गरजेचे - प्रा. दुर्गेश मंगेशकर

अभ्यासाचा पाया पक्का होणे गरजेचे - प्रा. दुर्गेश मंगेशकर

पुणे - 'अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश मिळणे अवघड नाही, मात्र देशातील सर्वोत्तम अभियांत्रिकी महाविद्यालयांत प्रवेश मिळवणे, हे खरे आव्हानात्मक असते. विद्यार्थ्यांमध्ये पुरेसा कौशल्य विकास घडवू शकतील अशा महाविद्यालयांत प्रवेश मिळावा यासाठी प्रयत्न करायला हवा. चांगला अभियंता बनण्यासाठी अभ्यासाचा पाया मुळातून पक्का होणे महत्त्वाचे असते. त्यातूनच वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स सोडविण्याच्या क्षमता विकसित होत असतात,’’ अशा शब्दांत आयआयटियन्स प्रशिक्षण केंद्राचे संचालक प्रा. दुर्गेश मंगेशकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

वैद्यकीय आणि अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा आणि त्यासंबंधीची तयारी याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘सकाळ विद्या’ आणि आयआयटियन्स प्रशिक्षण केंद्राने रविवारी आयोजिलेल्या कार्यशाळेत मंगेशकर बोलत होते. या वेळी डॉ. अनुराधा भगुरकर उपस्थित होत्या.
जेईई परीक्षेचे महत्त्व अधोरेखित करताना मंगेशकर म्हणाले, ‘‘सीईटी ही तुलनेने सोपी परीक्षा आहे. मात्र, कमी कष्टात सुखी राहू पाहण्याचा हा विचार फारसा उपयोगाचा नाही. उलट, सीईटीपेक्षाही जेईईचा अभ्यास अधिक सर्वांगीण क्षमता वाढवतो. ‘जेईई’मध्ये अभ्यासाची खोली महत्त्वाची ठरते. एकदा या परीक्षेसाठी तयारी केली, तर इतरही परीक्षांची तयारी होऊन जाते. हा मार्ग कठीण नक्कीच आहे, पण एकदा त्याच्याशी दोस्ती झाली की अभ्यास आनंदी होतो. ही परीक्षा विद्यार्थ्यांना स्वतःचा विचार करायला शिकवते.’’

चांगल्या गुणांसाठी जेईई व सीईटीच्या अभ्यासाची योग्य सांगड कशी घालावी, त्याचबरोबर वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘नीट’ परीक्षेचा अभ्यास कसा करावा, याचेही मार्गदर्शन या कार्यशाळेत करण्यात आले.

विद्यार्थ्यांसाठी टिप्स

  • खूप तास अभ्यास करण्यापेक्षा ‘फोकस्ड स्टडी’ करण्यावर 
  • भर द्या.
  • यापुढील काळात बारावीचे महत्त्व फक्त पात्रता निकष म्हणून आहे. त्यामुळे बारावीत ७५ टक्के गुण मिळवण्याइतकाच अभ्यास करत खरे लक्ष जेईई आणि नीटसारख्या परीक्षांवर केंद्रित करणे श्रेयस्कर.
  • वरवरचा आणि रमतगमत केलेला अभ्यास उपयोगाचा नाही. अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन हवे.
  • मूलभूत संकल्पना तयार असणे महत्त्वाचे.
  • अकरावी हे ‘रेस्ट इयर’ समजू नका.
  • मोबाईल आणि फेसबुक-व्हॉट्‌सॲपची संगत फार नको.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com