एफआरपी देण्यासाठी साखरेचा लिलाव

Sugar auction to be given to FRP
Sugar auction to be given to FRP

दौंड : दौंड तालुक्यातील पाटस येथील भीमा सहकारी साखर कारखान्याने एफआरपीपोटी थकविलेले 54 कोटी 45 लाख 50 हजार रूपयांची वसुली करण्याकरिता कारखान्याने उत्पादित केलेल्या साखरेचा लिलाव करून विक्री करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. साखर विक्रीपोटी तीस कोटी रूपये जमा झाले असून सदर रक्कम ऊस उत्पादकांच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करण्यात आली आहे. राज्यातील सत्ताधारी पक्षाचे सहयोगी सदस्य तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे आमदार राहुल कुल गेल्या 17 वर्षांपासून या कारखान्याचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.     

भीमा सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता 5 हजार मेट्रीक टन असून मागील हंगामात बंद असलेला कारखाना सन 2017 - 2018 या हंगामाकरिता सुरू करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत केंद्र सरकारकडून कर्ज स्वरूपात 35 कोटी 94 लाख रूपये उपलब्ध करून दिले होते. स्वतः मुख्यमंत्री 12 नोव्हेंबर 2017 रोजी मोळी टाकण्यासाठी कारखान्यावर आले होते. 

कारखान्याने 31 मार्च 2018 अखेर एकूण 3 लाख 92 हजार 290 मेट्रीक टन इतक्या उसाचे गाळप केले होते. परंतु एफआरपीची रक्कम थकविली होती. 2550 रूपये प्रति टन या दराने एफआरपी थकित होती. कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत संस्थापक असलेल्या रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख सर्फराज शेख यांनी थकित एफआरपीसाठी संबंधित मंत्रालयाकडे दाद मागून पाठपुरावा केला होता. त्यानंतर राज्याचे साखर आयुक्त यांनी 26 एप्रिल 2018 रोजी कारखान्याने नियमाप्रमाणे एफआरपी न दिल्याने कारखान्याने उत्पादित केलेली साखर आणि आवश्यकतेप्रमाणे कारखान्याची जंगम व स्थावर मालमत्ता विक्री करून सदर रक्कम ऊस पुरवठदारांना व्याजासह अदा करण्याचे आदेश दिले होते. सदर विक्री व्यवहारासाठी दौंडचे तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात आल्याने त्यांनी कारखान्याच्या साखरेची लिलावाद्वारे विक्री केली. 

दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना या बाबत विचारले असता ते म्हणाले, साखरेची विक्री प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लेखापरीक्षकांकडून आलेल्या यादीप्रमाणे विक्रीपोटी जमा झालेले तीस कोटी रूपये संबंधितांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहे. लिलाव घेणार्यांकडून उर्वरित रक्कम प्राप्त होताच ती रक्कम वर्ग करण्यात येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com