‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे राज्यात ‘समर यूथ समीट’

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 मे 2017

पुणे - शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करताना तरुण पिढीला समाज व देशासाठी रचनात्मक काम उभे करण्यास प्रेरणा मिळावी, यासाठी होत असलेल्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समीट’ना येत्या मंगळवार (ता. २३)पासून कोल्हापूर येथून सुरवात होत आहे. 

पुणे - शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करताना तरुण पिढीला समाज व देशासाठी रचनात्मक काम उभे करण्यास प्रेरणा मिळावी, यासाठी होत असलेल्या तीन दिवसांच्या ‘यिन समर यूथ समीट’ना येत्या मंगळवार (ता. २३)पासून कोल्हापूर येथून सुरवात होत आहे. 

पदवीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) या व्यासपीठाच्या माध्यमातून कोल्हापूरसह सोलापूर, नाशिक, नागपूर, सातारा, अकोला, पुणे, जळगाव, मुंबई, औरंगाबाद आणि नांदेडमध्ये ही शिबिरे होत आहेत. या शिबिरांसाठी स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी मुख्य प्रायोजक आहेत, तर निलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सीड इन्फोटेक आणि सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे सहप्रायोजक आहेत. 

या शिबिरात सहभागी होणाऱ्या युवकांना उद्योग, राजकारण, डिजिटल ऑनलाइन मार्केटिंग, टीम बिल्डिंग, शेअर मार्केट, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. 

गेल्या तीन वर्षांपासून ‘यिन’ या पद्धतीच्या शिबिराचे आयोजन करत असून, या आधीच्या शिबिरांमध्ये राज्यभरातील अनेक नामवंतांनी तरुणांना मार्गदर्शन केले आहे.

‘यिन’च्या ‘सुपर यूथ समीट’मध्ये तरुणाईचा सहभाग असणार आहे. राष्ट्रासाठी सक्षम अधिकारी निर्माण व्हावेत, यासाठी आजच्या तरुणाईला मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे.
- सुनील पाटील, संचालक, स्पेक्‍ट्रम ॲकॅडमी

आपल्या देशाचा प्रत्येकाला अभिमान आहेच. देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येकाने झटल्यास एक दिवस संपूर्ण देशाला आपला अभिमान वाटेल. भारत जगातील सर्वोत्तम देश व्हावा हा ‘सकाळ’ व ‘निलया एज्युकेशन ग्रुप’चा ध्यास आहे. चला ‘यिन’च्या साथीने आपण शिवबांच्या महाराष्ट्रात जिजाऊंच्या हिंदवी स्वराज्य निर्मितीच्या इच्छेनुरूप ‘हिंदवी सुराज्य’ निर्मितीची मुहूर्तमेढ रोवूया.
- निलय मेहता, संस्थापक, निलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

‘समर यूथ समीट’ उद्याच्या युवा भारत संकल्पनेकडे घेऊन जाणारे व युवकांना योग्य दिशा देणारे व्यासपीठ. या शिबिराचा भावी आणि सक्षम पिढी घडवण्यासाठी नक्कीच उपयोग होईल.
- नरेंद्र बराटे, संस्थापक, व्यवस्थापकीय संचालक, सीड इन्फोटेक

महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक बांधिलकी निर्माण करणारा तसेच त्यांच्या भविष्याची दिशा ठरवणारा स्तुत्य उपक्रम म्हणजेच ‘यिन’चा समर यूथ समीट कॅम्प.
- संजय चोरडिया, चेअरमन, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट

विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजन व्यवस्था
समीटमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ३ जूनपर्यंत ‘सकाळ’च्या स्थानिक कार्यालयाशी सकाळी १० ते ६ या वेळेत संपर्क साधावा. या समीटसाठी ‘यिन’ सदस्यांसाठी प्रत्येकी २०० रुपये तर सदस्येतरांसाठी प्रत्येकी ४०० रुपये शुल्क आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निवास व भोजन व्यवस्था केली जाणार आहे. तसेच, सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाणार आहेत. मर्यादित जागा असल्याने प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वावर नोंदणी केली जाईल.