विकासाबाबत राज्याची स्थिती चिंताजनक : सुप्रिया सुळे

विकासाबाबत राज्याची स्थिती चिंताजनक : सुप्रिया सुळे

पौड : ''ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी असलेला निधी केंद्र आणि राज्य सरकार दुसरीकडे वळवीत आहे. सरकारच्या सध्याच्या धोरणांमुळे विकासाबाबत राज्याची परिस्थिती चिंताजनक झाली आहे. त्यामुळे सत्तेत असलेले शिवसेनेचे कॅबिनेट दर्जाचे मंत्रीही, 'हे सरकार बदलले पाहिजे,' असे उघडउघड वक्तव्य करतात. सत्तेतलेच मंत्री जर सत्ताबदलाची भाषा बोलत असेल; तर न्याय मागायचा कुणाकडे?'' असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. 

कोंढावळे (ता. मुळशी) येथे गावभेट दौऱ्यात सुळे बोलत होत्या. या वेळी रामचंद्र ठोंबरे, राजेंद्र हगवणे, कोमल साखरे, पांडुरंग ओझरकर, कोमल वाशिवले, शंकर मांडेकर, अंजली कांबळे, सुनील चांदेरे, सचिन घोटकुले, वैशाली गोपालघरे, सुनील वाडकर, जितेंद्र इंगवले आदी उपस्थित होते. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष अमित कंधारे, माजी उपसरपंच विनोद कंधारे, सरपंच अनंता कंधारे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

ठोंबरे म्हणाले, ''शरद पवार यांना पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पक्षाचे पाठबळ वाढविले पाहिजे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेचे मूलभूत प्रश्‍न सोडविण्यासाठी अजित पवार, सुप्रियाताई सुळे पुढाकार घेत आहेत. त्यांना आपण एकदिलाने साथ दिली पाहिजे.'' 

प्रास्ताविकात अमित कंधारे यांनी येणाऱ्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीत मताधिक्‍क्‍यासाठी मुळशीतील युवक तयारीला लागला असल्याचे सांगितले. या वेळी संजय जोरी, रामचंद्र भरम यांच्यासह अनेक युवकांनी 'राष्ट्रवादी'त प्रवेश केला. त्यांचा सुळे यांनी सत्कार केला. ग्रामस्थांनी ढोल-ताशाच्या गजरात वाजत-गाजत मिरवणूक काढीत सुळे यांचे स्वागत केले. 

दरम्यान, गावातील राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी, आम्हाला राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाची माहिती दिली जात नाही, अशा तक्रारी सुळे यांच्याकडे केल्या. 

''शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असताना हे सरकार बुलेट ट्रेनचा विचार करत आहे. अंगणवाडी सेविकांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला; तर सरकारने या कर्मचाऱ्यांवर 'मेस्मा' लावला. हागणदारीमुक्तीबाबत राज्यातील वास्तविकता वेगळी आहे. हेलिकॉप्टरमध्ये बसून मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्यांच्या व्यथा काय कळणार? त्यामुळेच या कुचकामी सरकारच्या विरोधात 'राष्ट्रवादी'ने काढलेल्या हल्लाबोल आंदोलनाला राज्यात भरभरून प्रतिसाद मिळाला.'' 
- सुप्रिया सुळे, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com