‘स्वाइन फ्लू’ची चार जणांना लागण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 मार्च 2017

पिंपरी - स्वाइन फ्लूच्या सात संशयित रुग्णांना पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. तसेच यापूर्वी ॲडमिट केलेल्या चार जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे तपासणीमध्ये उघड झाले.

पिंपरी - स्वाइन फ्लूच्या सात संशयित रुग्णांना पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. तसेच यापूर्वी ॲडमिट केलेल्या चार जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे तपासणीमध्ये उघड झाले.

स्वाइन फ्लूचा प्रसार हिवाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतो. मात्र सध्या कडक उन्हाळा असतानाही स्वाइन फ्लूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत असल्याचे दिसून आले आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये १ जानेवारी २०१७ पासून एक लाख ८० हजार ३५४ जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी १२ हजार ७९८ रुग्ण हे तापाचे आढळून आले. त्यापैकी एक हजार ६७ जणांना स्वाइन फ्लू प्रतिबंधक औषधे देण्यात आली. तर २५ जणांचे नुमने प्रयोग शाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले. आत्तापर्यंत सात जणांना स्वाइन फ्लूची लागण झाल्याचे तपासणीत समोर आले आहे. त्यापैकी एकाचा स्वाइन फ्लूने मृत्यूही झाला आहे. तर सध्या दोघे जण व्हेंटिलेटरवर आहेत. मंगळवारी तीन खासगी रुग्णालयांमध्ये सात स्वाइन फ्लूच्या संशयित रुग्णांना दाखल केले आहे. त्यापैकी चार जणांना स्वाइन फ्लू झाल्याचे तपासणीमध्ये समोर आले आहे. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

पुणे

खडकवासला : धरण क्षेत्रात रविवारी सकाळी विक्रमी पाऊस पडला असून, 24 तासात 60 मिलिमीटर पाऊस पडला आहे. पानशेत धरण 100 टक्के...

10.48 AM

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत दरवर्षी प्रमाणे पालिका प्रशासनाकडुन गणपती उत्सवासाठी चोख...

10.03 AM

बारामती : 'राज्यात पाऊस होण्यासंबंधीचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज खरा ठरल्यास तोंडात...

09.45 AM