ग्रामीण लेखकांची दखल घ्या - डॉ. नागनाथ कोत्तापल्ले

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 22 मे 2017

पुणे - ""ग्रामीण भागात अनेक नवोदित कवी, लेखक आपल्या अनुभवांना शब्दरूप देऊन व्यक्त होत आहेत. परंतु त्यांना मार्गदर्शन, प्रोत्साहन मिळत नसल्याने त्यांचे साहित्यभान वाढीस लागत नाही. याचा विचार करून प्रस्थापित लेखकांनी ग्रामीण भागातील नवोदितांच्या लेखनाची दखल घ्यावी,'' असे मत साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी रविवारी व्यक्त केले. 

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे आयोजित मराठी गझल कार्यशाळेचे उद्‌घाटन डॉ. कोत्तापल्ले यांच्या हस्ते झाले. या वेळी गझलकार चंद्रशेखर सानेकर, "रंगत-संगत'चे ऍड. प्रमोद आडकर, समन्वयक भूषण कटककर उपस्थित होते. 

डॉ. कोत्तापल्ले म्हणाले, ""ग्रामीण भागातील जो घटक आता लिहू पाहत आहे, तो अनेक वर्षे दबला गेला होता. पिढ्यान्‌पिढ्या त्याला काहीतरी सांगायचे आहे, व्यक्त व्हायचे आहे. त्यांची, त्यांच्या अनुभवांची, भावनांची आजवर कोणी दखलच घेतली नाही. ती घ्यायला हवी.'' सानेकर म्हणाले, ""गझल लिहिण्याचे तंत्र आहे. परंतु गझल ही तंत्राच्या आधारेच लिहिता येते, हा गैरसमज आहे. मी स्वतः गझल लिहिताना तंत्राला केंद्रस्थानी ठेवत नाही.''