तळेगावचा ब्रिटिशकालीन रेल्वे पूल वेढला झाडांनी

तळेगाव दाभाडे (स्टेशन) - ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाच्या कठड्यावर वाढलेली झाडे.
तळेगाव दाभाडे (स्टेशन) - ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाच्या कठड्यावर वाढलेली झाडे.

तळेगाव दाभाडे (स्टेशन) - येथील ब्रिटिशकालीन रेल्वे पुलाच्या भिंतीमध्ये व त्याच्या बोगद्याच्या दुतर्फा दाट झाडी वाढल्याने मार्ग धोकादायक बनला आहे. त्‍यामुळे सुमारे १२० वर्षांपूर्वीच्या पुलाचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. 

रेल्वे प्रशासनाने त्याची तातडीने दखल न घेतल्यास मोठा अपघात होण्याची शक्‍यता आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी पुलाच्या दुरुस्तीचे व झाडी तोडण्याची कामे त्वरित हाती घ्यावीत, अशी मागणी प्रवाशांनी केली.

मुंबई ते पुणे रेल्वेगाड्या आणि लोकल याच मार्गावरून धावतात. नवीन पुलावरून दिवसरात्र अवजड वाहनाची वाहतूक सुरू असते. जुना पूल व नवीन पुलामधील जागेत मातीच्या ढिगाऱ्यावर वाढलेली झाडी, दगड, माती लोहामार्हावर पडण्याचा धोका आहे. एरंड, पिंपळ व रान झाडी यांची पुलाच्या दगडामध्ये वाढ झाली आहे. त्याची मुळे खोल रुजल्याने दगडामध्ये भेगा पडून त्यातून सतत पाणी झिरपत असते. खडकही ठिसूळ बनले आहेत.

सध्या तळेगाव परिसरात पाऊस सुरू आहे. गेल्या वर्षी संततधार पावसामुळे पुलाजवळचा भराव कोसळला होता. रेल्वेचालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली होती. या पार्श्‍वभूमीवर पुलाच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्याची गरज आहे.

तळेगाव येथील जुन्या रेल्वे पुलाच्या भिंतीमध्ये अनेक ठिकाणी लहान-मोठी झाडे वाढलेली आहे. बऱ्याच दिवसांपासून हीच परिस्थिती कायम आहे. प्रवाशांच्या व पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने विचार करता रेल्वे प्रशासनाने ही झाडी काढण्याची आवश्‍यकता आहे.
- प्रसाद करंडे, रेल्वे प्रवासी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com