थंडीचा कडाका वाढण्याची शक्‍यता 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

पुणे - शहरात पुढील तीन दिवसांमध्ये थंडीचा कडाका वाढण्याची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविली आहे. बुधवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत किमान तापमान 8.5 अंश सेल्सिअस नोंदले गेले. हे तापमान 7 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होईल, असे हवामान खात्यातर्फे सांगण्यात आले. 

उत्तर भारतातून महाराष्ट्राच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत. त्याच्या प्रभावामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. आकाश निरभ्र असल्याने थंडी वाढेल, असे हवामान खात्यातर्फे स्पष्ट करण्यात आले. शहरातील किमान तापमानाचा पारा 2 अंश सेल्सिअसने कमी झाला असून, राज्यात नगर येथे सर्वांत कमी म्हणजे 4.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. शहर आणि परिसरात पुढील चोवीस तासांमध्ये किमान तापमान 8 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होणार आहे.

पुणे

नवी सांगवी - पुणे जिल्हा माहेश्‍वरी प्रगती मंडल व सांगवी परिसर महेश मंडल आयोजित संपूर्ण भारतातील मारवाडी समाजाकरीता ‘तीज सत्तु...

05.09 PM

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहरातील पुणे व पिंपरी चिंचवड शहराचे उपनगर असलेल्या जुनी सांगवीत या वर्षी विविध सामाजिक...

02.15 PM

पुणे - पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्या आठशे बस दीड वर्षात टप्प्याटप्प्याने दाखल होणार आहेत. यामुळे शहर आणि...

09.36 AM