झोपा काढणारे दहा जण  पीएमपीमधून निलंबित 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 एप्रिल 2017

पुणे - कामाच्या ठिकाणी आणि कामाच्या वेळेतच झोपा काढणाऱ्या भोसरी आगारातील दहा कर्मचाऱ्यांवर पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बुधवारी निलंबनाची कारवाई केली. 

पुणे - कामाच्या ठिकाणी आणि कामाच्या वेळेतच झोपा काढणाऱ्या भोसरी आगारातील दहा कर्मचाऱ्यांवर पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांनी बुधवारी निलंबनाची कारवाई केली. 

पीएमपीच्या 13 आगारांत अचानक पाहणी करण्यासाठी मुंढे यांनी चार अधिकाऱ्यांचे पथक तयार केले आहे. मंगळवारी पहाटे हे पथक भोसरी आगारात तपासणीसाठी गेले. तेव्हा कार्यशाळेतील 9 कर्मचारी आणि 1 वाहक झोपलेले आढळले. पथकाने त्याबाबतचा अहवाल सादर केल्यावर मुंढे यांनी निलंबनाची कारवाई केली. दरम्यान, 2016-17 या वर्षात सेवा नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल 31 कर्मचाऱ्यांना ताकीद देण्यात आली आहे, तर 900 कर्मचाऱ्यांना दंड सुनावण्यात आला आहे. तसेच 43 कर्मचाऱ्यांकडून आर्थिक नुकसानाची भरपाई करण्यात आली आहे. 242 कर्मचाऱ्यांची एक वर्षाची वेतनवाढ रोखण्यात आली असून, 14 कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. सरत्या वर्षात 1258 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, तथ्य नसल्यामुळे 28 प्रकरणे दफ्तरी दाखल करण्यात आली आहेत, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली. 

Web Title: Ten people were suspended from the PMP