दांपत्याची दुचाकी अडवून चोरट्यानी लुटले. 

दांपत्याची दुचाकी अडवून चोरट्यानी लुटले. 

उंडवडी : बारामती - पाटस फाट्यावरुन साबळेवाडीकडे जात असताना निर्जन ठिकाणी साबळेवाडीच्या गुळूमकर दांपत्याला अडवून अज्ञात चोरट्यानी लुटले. ही घटना शनिवारी (ता. 13) रोजी रात्री नऊच्या दरम्यान घडली. या घटनेत चोरट्यानी नवरा - बायकोला मारहाण करुन महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोन्याचे दागिने घेवून पळ काढला. 

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, साबळेवाडी (ता. बारामती) येथील राजेंद्र सुरेश गुळूमकर (वय 37) हे त्यांची पत्नी माधुरी व मुलगा ओंकार यांना बारामती येथील दवाखान्यातील काम आटपून बजाज कंपनीची डिस्कव्हर दुचाकी (क्रमांक एम.एच 42- पी 3622) वरुन बारामती-पाटस रस्त्यावरील शिर्सुफळ फाट्यावरुन शनिवारी रात्री नऊ वाजता घराकडे (साबळेवाडी) जात होते.

यावेळी त्यांची दुचाकी येथील वनक्षेत्रात लगत साबळेवाडीच्या हद्दीत आल्यानंतर पाठीमागून दुचाकीवरुन आलेल्या अज्ञात चोरट्यानी गुळूमकर यांच्या डोक्यात काठीने मारले. त्यामुळे गुळूमकर यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने त्यांनी दुचाकी थांबवली. त्यानंतर चोरट्यानी पती व पत्नीला जबर मारहाण करुन महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व कानातील सोन्याची दागिने असा 35 हजारांचा ऐवज लंपास केला. या घटनेनंतर रस्त्याने आलेल्या गुळूमकर यांच्या ओळखीच्या दुचाकीस्वारानी राजेंद्र गुळूमकर व त्यांच्या पत्नीला मारहाण झाल्याचे पाहून इतर ग्रामस्थांना फोन करुन घटनेची माहिती दिली. गुळूमकर यांना उपचारासाठी बारामती येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यानंतर खराडेवाडी, साबळेवाडी व उंडवडी सुपेच्या परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली व वनक्षेत्राच्या परिसरात चोरट्यांचा रात्री उशिरापर्यंत शोध घेतला. मात्र चोरटे अंधाराचा फायदा घेवून पसार झाले. याबाबत बारामती तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे हे करीत आहेत.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com