'अल कायदा'शी संबंधित संघटनेच्या तिघांना पुण्यात अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 मार्च 2018

पुणे : दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) पुणे विभागाने शनिवारी तीन बांगलादेशी नागरिकांना अटक केली. बांगलादेश सरकारने बंदी घातलेल्या 'अन्सारउल्लाह बांगला टीम' (एबीटी) या संघटनेचे ते हस्तक आहेत. तर 'एबीटी' ही 'अल कायदा' या संघटनेशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती आता पुढे येऊ लागली आहे. 

राज्य 'एटीएस'कडून बांगलादेशी घुसखोरांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. या पार्श्‍वभूमीवर शहर व जिल्ह्यात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यासाठी पुणे 'एटीएस'कडून माहिती गोळा केली जात होती. त्यामध्ये आकुर्डी व वानवडीमध्ये तीन बांगलादेशी नागरिक बेकायदा वास्तव्य करत असून, त्यांचा बांगलादेशातील बंदी असलेल्या 'एबीटी' या संघटनेशी संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पुणे 'एटीएस'चे सहायक आयुक्त सुनील दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राम जाधव यांच्या पथकाने तपासाला सुरवात केली. या पथकाने आकुर्डी व वानवडी येथून तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड जप्त केली आहेत. 

तिघांपैकी दोघे जण बांगलादेशातील खुलना जिल्ह्यातील पुष्पकाली या गावचे रहिवासी आहेत. तर तिसरा नागरिक हा शरियतपूर जिल्ह्यातील बिराककुंडी गावातील आहे. अटक केलेल्यांचा 'अल कायदा' किंवा अन्य दहशतवादी संघटनांशी संबंध आहे का? पुण्यात येण्यामागील हेतू काय होता? वेगळी कारणे काय आहेत?, अशा प्रकारची माहिती त्यांच्याकडून घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

Web Title: Three al qaeda affiliates arrested in Pune by ATS