नगराध्यक्षपदासाठी सासवडला 3 अर्ज 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

आज (ता. 17) एक दिवसात नगरसेवकपदासाठी 24 उमेदवारी अर्ज आले. कालअखेर 13 अर्ज आले होते. त्यामुळे आजअखेर 37 अर्ज आले. नगराध्यक्षपदाकरिता डॉ. राजेश दळवी व मार्तंड भोंडे यांचे काल अर्ज आलेच होते. आज पुन्हा मार्तंड यांनी दुसरा अर्ज दाखल केला; तर सचिन भोंडे यांचा नव्याने अर्ज दाखल झाला. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आता दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. अनेकजण उमेदवारी अर्ज ऑनलाइन भरून व प्रतिज्ञापत्रे, दाखले स्कॅन करून दाखल करत आहेत. त्याची प्रत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे ते उद्या व परवा देतील. त्यामुळे उर्वरित दोन दिवसात बरेच उमेदवारी अर्ज दाखल होण्याची चिन्हे आहेत.  

Web Title: Three nominations in saswad

टॅग्स