तीन सराईत गुन्हेगारांना दोन पिस्तुलांसह अटक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

पुणे - फरासखाना पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून दोन पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. 

पुणे - फरासखाना पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून दोन पिस्तुलांसह जिवंत काडतुसे जप्त केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात आली. 

सागर मोहन मोकाशी (वय 26, रा. भिवडी, ता. पुरंदर, जि. पुणे), मयूर बाळासाहेब साबळे (वय 26, रा. साबळे मळा, वडकी नाला, ता. हवेली) आणि दत्तात्रेय पांडुरंग फाटे (वय 30, रा. वडकी तळेवाडी, ता. हवेली) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे सर्व जण पुणे ग्रामीणच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडे बेकायदा अग्निशस्त्रे असून, ते पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून शाहीर अमर शेख चौकाकडून कुंभार वेस चौकाकडे जात आहेत, अशी माहिती पोलिस कर्मचारी शंकर कुंभार यांना मिळाली. फरासखाना पोलिस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक निरीक्षक महेंद्र जाधव यांनी ही बाब वरिष्ठांना कळवून दोन पथके तयार केली. त्यांनी तिघांना अटक करून मोटार, दोन गावठी पिस्तूल आणि काडतुसे असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज जप्त केला. सागर मोकाशी याच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल असून, सासवड पोलिस त्याच्या शोधात होते; तर मयूर साबळे याच्याविरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. 

अतिरिक्‍त पोलिस आयुक्‍त (दक्षिण) प्रदीप देशपांडे, परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्‍त सुधीर हिरेमठ यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ निरीक्षक रेखा साळुंखे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र चव्हाण, जयराम पायगुडे, कर्मचारी विनायक शिंदे, संदीप पाटील, संजय गायकवाड, इक्‍बाल शेख, ज्ञानेश्‍वर देवकर, बापू खुटवड, हर्षल शिंदे, बाबासाहेब गोरे, अमोल सरडे, विकास बोऱ्हाडे, अमेय रसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Three notorious criminals arrested