ओवेसी यांची आज सभा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 फेब्रुवारी 2017

पुणे - ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल- मुसलीमीन (एमआयएम) व मित्र पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ पक्षाचे नेते आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या सभेने होणार आहे. ही सभा प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळील (आरटीओ) श्री शिवाजी प्रीपरेटरी मिलिटरी स्कूलच्या (एसएसपीएमएस) मैदानात बुधवारी (ता.1) सायंकाळी सहा वाजता होईल. 

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी ओवेसी यांची पहिल्यांदाच सभा होणार आहे. पक्षाने पोलिस प्रशासनाला सभेसाठी पाच ठिकाणे सुचविली होती. त्यानुसार पोलिसांनी "एसएसपीएमएस' मैदानास परवानगी दिली. पक्षाचे आमदार वारीस पठाण व पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी या मैदानाची पाहणी केली. सभेसाठी आमदार इम्तियाज जलील, पठाण, प्रदेशाध्यक्ष मोईन सय्यद, प्रदेश कोअर कमिटीचे सदस्य अंजुम इनामदार, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष डॉ. सुरेश माने, प्रदेश महासचिव मिलिंद अहिरे, रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डिंबळे, "एमआयएम'चे शहराध्यक्ष जुबेर शेख, पिंपरी-चिंचवडचे अध्यक्ष अकील मुजावर उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Today Akbaruddin Owaisi session