oil
oilesakal

देशात खाद्यतेलाला भाववाढीची फोडणी!

खाद्यतेलाच्या भावात डब्यामागे १०० ते २०० रुपयांची वाढ झालीच; इंडोनेशिया आणि मलेशिया टनामागे ५० ते ६० डॉलरने वाढ

पुणे : युक्रेन-रशिया वादासह जगभरात तेलबियांच्या उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे खाद्यतेलाच्या भावात डब्यामागे १०० ते २०० रुपयांची वाढ झाली आहे. तसेच इंडोनेशिया आणि मलेशिया या पामतेल निर्यातदार देशांनी कच्च्या पाम तेलाच्या भावात टनामागे ५० ते ६० डॉलरने वाढ केली. याचाही मोठा परिणाम खाद्यतेलाच्या भाव वाढीवर झाला आहे.भारत खाद्यातेलासाठी आयातीवर अवलंबून आहे. पेट्रोलनंतर देशात सर्वाधिक आयात खाद्यतेलांची केली जाते. जागतिक बाजारपेठेत चीननंतर भारत खाद्यातेलांचा दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार देश आहे.

देशात दरवर्षी एकूण मागणीच्या सुमारे ७० टक्के खाद्यतेलाची आयात केले जाते. तर देशात मागणीच्या ३० टक्के खाद्यतेलाची निर्मिती देशात होते. खाद्यतेलाच्या बाबतीत भारत बहुतांशी आयातीवर अवलंबून आहे. त्यामुळे जगभरातील बाजारातील भाववाढीचा परिणाम देशातील बाजारात तातडीने होत असल्याची माहिती मार्केट यार्डातील खाद्यतेलाचे व्यापारी रायकुमार नहार यांनी दिली.वाहतूक खर्च वाढलेला आहे. देशांतर्गत कर, वाहतूक खर्च आदी बाबी विचारात घेतल्यास किरकोळ बाजारात खाद्यतेलांच्या भावात घट होत नाही. तसेच शहरातील हॉटेल्स, खानावळी, विविध प्रकारच्या खाद्यपदार्थ विक्रेत्यांकडून पाम तेलाला मागणी वाढली आहे. तर घरगुती ग्राहकांकडून सूर्यफुल आणि शेंगदाणा तेलाला मागणी आहे असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

अशी आहे स्थिती
- जगभरात खाद्य तेलाचा तुटवडा
- जागतिक बाजारपेठेत भाववाढ
- जगभरात तेलबियांचे उत्पादन कमी
- भारतात एकूण सूर्यफूल खाद्यतेल १९ लाख टन आयात
- १४ लाख टन सूर्यफूल खाद्यतेल युक्रेन वरून आयात

दरवर्षांला दीडशे लाख टन खाद्यतेल आयात
जागतिक बाजारपेठेत दुसऱ्या क्रमांकाचा आयातदार असलेल्या भारतात दरवर्षांला दीडशे लाख टन खाद्यतेल आयात केले जाते. भारताची वर्षाला गरज २२५ लाख टन आहे. देशात दर वर्षी साधारणतः ८० लाख टन तेलनिर्मिती केली जाते.

येथून होते आवक
सूर्यफूल : रशिया, युक्रेन
सोयाबीन : अर्जेंटिना, ब्राझील
पामतेल : स्वित्झर्लंड, इंडोनेशिया, मलेशिया
शेंगदाणा : महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश, तमिळनाडू,

केंद्र सरकारने पामतेलावरील आयात शुल्कात अडीच टक्क्यांनी कपात केली आहे. मात्र, आयातशुल्क कमी केले असले तरी पामतेलाची निर्यात करणाऱ्या देशांनी भाववाढ केली आहे. युक्रेन रशिया वादाचा मोठा परिणाम दरवाढीवर झाला आहे.
- रायकुमार नहार, खाद्यतेलाचे व्यापारी, मार्केट यार्ड

खाद्य तेलांसह विविध वस्तूंमध्ये सातत्याने भाववाढ होत आहे. त्यामुळे महिनाभराचे बजेट कोलमडत आहे. सरकारकडून भाववाढीवर नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
- रेश्मा मोरे, गृहिणी, कात्रज

घाऊक बाजारातील तेलाची बदलती परिस्थिती
तेलाचे प्रकार - डिसेंबर २०२१ - फेब्रुवारी २०२२
सूर्यफूल -- १९५० - २०८० २१२०- २२२० (१५ लिटर)
सोयाबीन -- १८०० - ----- २०००-२१७० - (१५ लिटर)
सरकी तेल -- १८४० - १८५० २०७०-२१०० (१५ लिटर)
वनस्पती -- १८५० -२१७० २१५०-२५०० (१५ किलो)
पाम तेल -- २००० - --- २१८०-२२५० (१५ किलो)
शेंगदाणा -- २३५०-२४०० २४५०- ------ (१५ किलो)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com